Accident News : भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Buldhana Khamgaon Akola Road Car Accident News : खामगाव–अकोला मार्गावर पहाटे भरधाव कारने चालत्या ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident : भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Buldhana Khamgaon Akola Road Car Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • खामगाव–अकोला मार्गावर पहाटे भीषण अपघात

  • भरधाव कारने चालत्या ट्रकला मागून धडक

  • एकाचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

  • काही काळ वाहतूक विस्कळीत

  • अतिवेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

Buldhana Khamgaon Akola Road Fatal Car Accident खामगाव–अकोला मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने चालत्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर कारमधील आणखी एक जण सुदैवाने किरकोळ दुखापतींसह बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास खामगावहून अकोल्याच्या दिशेने जाणारी कार अतिवेगात होती. दरम्यान, पुढे चाललेल्या ट्रकवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णतः चिरडला गेला. अपघातात कारमधील प्रवासी अडकून पडले होते.

Accident : भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Nashik Accident : भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला, विटांखाली दबून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Accident : भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

या अपघातामुळे काही काळ खामगाव–अकोला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालना असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस अधिक तपास करत असून अपघातातील मृत व जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com