buldana news Ravikant Tupkar health suddenly deteriorated doctor advised rest for one week
buldana news Ravikant Tupkar health suddenly deteriorated doctor advised rest for one weekSaam Tv

Ravikant Tupkar Health: रविकांत तुपकारांची अचानक तब्बेत बिघडली; डॉक्टरांकडून आठवडाभर विश्रांतीचा सल्ला

Ravikant Tupkar Health Updates: आजारपण केव्हा व कधी येईल हे सांगता येत नाही असाच काही प्रकार रविकांत तुपकारावर यांच्यावर येऊन ठेपला आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Ravikant Tupkar Health Updates: राज्यात शेतकरी प्रश्नांचा मुद्दा उचलून धरणारे तसेच दिवस रात्र शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर रस्त्यावर उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी कमीतकमी आठवडाभर एकदम आराम करण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

आजारपण केव्हा व कधी येईल हे सांगता येत नाही असाच काही प्रकार रविकांत तुपकारावर यांच्यावर येऊन ठेपला आहे. तशी एक पोस्ट त्यांनी स्वतः सोशल माध्यमावर शेअर केली असल्याने सर्वांच्या मनात धस झाले आहे. रविकांत तुपकर यांनी केली फेसबुक पोस्ट जशीच्या तशी...

buldana news Ravikant Tupkar health suddenly deteriorated doctor advised rest for one week
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग सुरू, आज बडा नेता शिवबंधन बांधणार; शिंदे गटाचं टेन्शन वाढणार

आठवडाभर सक्तीच्या वैद्यकीय रजेवर जातोय..!

"आजवर वैयक्तिक कारणासाठी कधी सार्वजनिक जीवनातून सुट्टी घेतल्याचे आठवत नाही. पण कधीतरी अशी परिस्थिती उद्भवते की, त्यापुढे आपले काही चालत नाही. प्रवासादरम्यान अचानक झटका बसल्याने दुखापत झाली व माझ्या छातीमधील Sternum Bone मध्ये Fracture झाले आहे. त्यामुळे श्वास घेतांना व बोलतांना प्रचंड वेदना होत आहेत".

"त्याचे ऑपरेशन करणे शक्य नसल्यामुळे काही दिवस पूर्णवेळ विश्रांती आणि औषधोपचार हाच एक उपाय आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला कमीत कमी एक आठवड्यासाठी पूर्णपणे प्रवास, हालचाल बंद करून औषधोपचार कम्पलसरी केला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनातून सक्तीची सुट्टी घेऊन आराम करावा लागेल".

"लोकांचे प्रश्न, कार्यक्रम, आंदोलने आणि मोर्चांपेक्षा एवढे दिवस घरात राहून आराम करणे ही माझ्यासाठी सर्वांत जास्त आव्हानात्मक गोष्ट आहे. पण आता नाईलाजाने हे आव्हान स्वीकारावे लागेल. मी फिल्डवर प्रत्यक्षात हजर नसलो तरी, आपल्या बुलढाणा व चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरची टीम तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आपले प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असतील".

buldana news Ravikant Tupkar health suddenly deteriorated doctor advised rest for one week
Chandrayaan-3 Mission: प्रतीक्षा चंद्रस्पर्शाची! भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस; विक्रम लँडर चंद्रावर उतरणार

"नेहमीप्रमाणे तेही आपले काम 'ऑन दि स्पॉट' करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, काम थांबणार नाही ते अविरत सुरूच राहील. मी शारिरीकदृष्ट्या उपलब्ध नसलो तरी सर्व घडामोडींवर माझे पूर्ण लक्ष असेल. एखादी आपत्कालीन बाब असल्यास माझी पत्नी अ‍ॅड. शर्वरी सावजी-तुपकर यांना संपर्क साधावा".

"सवय नसली तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या मला विश्रांतीची आवश्यकता असल्याने, तसेच जास्त बोलता येणे शक्य नसल्याने, कुणालाही प्रत्यक्ष भेटू शकणार नाही अथवा फोनवर बोलू शकणार नाही, याची नोंद घ्यावी".

"आपल्या शुभेच्छा व आशीर्वांदांच्या जोरावरच आतापर्यंतच्या टप्पा मी पार केला आहे व त्याच शुभेच्छा व आशीर्वांदांमुळे मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन आठवडाभरातच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, याची खात्री वाटते. माझ्या दुखापतीमुळे आपली काही गैरसोय झाल्यास क्षमस्व", अशी फेसबुक पोस्ट रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com