Today Marathi News : नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस बंदोबस्तात घरी सोडलं

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (7 june 2024) : राजकीय घडामोडी, राजकारण, सत्तास्थापनेच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस बंदोबस्तात घरी सोडलं

नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे यांच्या माघारीसाठी शिंदेच्या शिवसेनेचा पोलीस ठाण्यात गोंधळ

दुपारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आमदार किशोर दराडे यांच्याकडून डमी उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा केला होता आरोप

डमी उमेदवार किशोर दराडे यांच्या जीवाला धोका असल्याने दुपारपासून त्यांना ठेवले होतं नाशिकरोड पोलीस ठाण्यात

डमी उमेदवार किशोर दराडे यांना त्यांच्या आई वडील आणि बायकोच्या ताब्यात देण्यात आलं. पोलीस बंदोबस्तात त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येत आहे.

संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही भागातील वीज पुरवठा खंडित

जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह शहरात पावसाची हजेरी.

मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा.

गेल्या दोन दिवसापासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळच्या सुमारास हे ढग दाटून आल्याने पावसाला सुरुवात झाली.

पाऊस सुरू होताच काही भागातली वीज पुरवठाही खंडित झाला होता.

शिवसेनेला मिळणार एकच कॅबिनेट मंत्रिपद,  दोन खासदारामध्ये रस्सीखेच

खासदार प्रतापराव जाधव आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात रस्सीखेच

परवा होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकाच कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी - सूत्र

भविष्यात १ मंत्रिपद देण्याचं शिवसेनेला आश्वासन

दोघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याकडे लक्ष

नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस, वादळीवाऱ्याचाही तडाखा

नाशिक जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास सर्वत्र वादळी वारा, मेघागर्जने सह पावसाने जोरदार हजेरी लावली असून येवला तालुक्यातील नागरसुल येथे भरलेल्या आठवडे बाजारात वादळी वारा व पावसाने दुकानदारांचे चांगलेच नुकसान झाले आहे,जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानदारांचे पाल यात उडून गेल्याने त्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे..तर दुसरीकडे मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून त्याला शेती कामा साठी आणखी जोरदार पावसाची प्रतीकशा लागून राहिली आहे

पश्चिम रेल्वेची विरार - डहाणू डाऊन मार्गावरील सेवा विस्कळीत

विरार रेल्वे स्थानकात सेंटर पॉवर फेल्यूअर झाल्याने पश्चिम रेल्वेची विरार डहाणू दरम्यानची डाऊन मार्गांवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. मुंबईहून सुरत कडे जाणाऱ्या फलाईंग राणी, वलसाड एक्स्प्रेस गाड्या एक ते दोन तास उशिराने धावतील. तर डहाणूकडे जाणारी लोकल ट्रेन ही १ तास उशिराने धावेल अशी माहिती पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशाना देण्यात येत आहे. सद्या फलाईंग राणी या एक्स्प्रेस गाडीला नालासोपारा रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आलं आहे.

शिवसेना खासदारांची थोड्याच वेळात बैठक, NDA बैठकीतील तपशील खासदारांसमोर मांडणार

शिवसेना खासदारांची थोड्याच वेळात बैठक

श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक

NDA बैठकीतील तपशील खासदारांसमोर मांडला जाण्याची शक्यता

मंत्रिपद कोणाला द्यायच याचीही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

बैठकीसाठी खासदार श्रीरंग बारणे पोहोचले

NDA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल

दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक होत असून या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीला अमित शाह, राजनाथ सिंह उपस्थित आहेत.

विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढणार, रमेश चेन्नीथला यांची माहिती

रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रभारी बाईट

उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला आलो होतो

महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगलं काम केलं, त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करायला आलो होतो

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढणार आणि सरकार स्थापन करणार

विशाल पाटील यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही चर्चा झालेली नाही

विशाल पाटील हे काँग्रेससोबत आहेत, इंडिया आघाडीसोबत आहेत, हे चांगलं आहे

400 जागा मिळाल्या असत्या तर यांनी संविधान बदललं असतं

फडणवीस यांची नाराजी हा त्यांचा अंतर्गत विषय : अजित पवार

फडणवीस यांची नाराजी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आमच्या समोर त्यावर कुठलीही चर्चा नाही

आज दुपारी आम्ही तिघांनी बसून विधानसभेला सामोरं जाताना पुढची काय रणनीती असावी यावर चर्चा केली, असं अजित पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींकडून NDA ला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण, नरेंद्र मोदी राष्ट्रपतीभवनाकडे रवाना

राष्ट्रपतींनी एनडीएला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. एनडीए ने निमंत्रण स्वीकारलं असून नरेंद्र मोदी घटक पक्षांच्या नेत्यासह राष्ट्रपतीभवनाकडे रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस २ केंद्रीय मंत्रिपदाची मागणी करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री मंडळात दोन मंत्रीपद मागण्यात येण्याची शक्यता

नुकत्याच आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन मंत्री पद मिळावीत अशी आमदारांनी मागणी केली होती

आज पार पडणाऱ्या एनडीएच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद सांगण्याची शक्यता

दिल्लीत झालेल्या संसदीय बैठकीत पुण्यातील दोन्ही खासदारांची उपस्थिती

पंतप्रधानांच्या बैठकीला दोन्ही खासदारांची वर्णी

राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ दिल्लीतील बैठकीत उपस्थितीत

"पुण्याच्या विकासासाठी एक साथ" असं म्हणत केले फोटो शेयर

दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी होणार एनडीएची बैठक

थोड्याच वेळात NDA च्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी होणार बैठक

बैठकीसाठी अमित शाह, राजनाथ सिंह पोहोचले

अजित पवार, प्रफुल पटेल पोहोचले

थोड्याच वेळात एकनाथ शिंदे, पोहोचतील

बैठकीत मंत्रिपद वाटप आणि इतर मुद्यावर चर्चा होणार

बैठकीनंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जातील

Shiv Sena Eknath Shinde Group : शिवसेना लोकसभा गट नेतेपदी कल्याण-डोंबिवली चे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड

शिवसेना लोकसभा गट नेतेपदी कल्याण-डोंबिवली चे खासदार श्रीकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आलीय.शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलांय.शिवसेना लोकसभा गटनेता निवडीसाठी संसदीय समिती सदस्य खासदार श्रीरंग बारणे यांनी डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले.

काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड, सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, अस्लम शेख यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दिल्ली मोठी बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना अहमदनगरमधून विधानसभेचं तिकीट देण्याची मागणी

पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तिकीट द्यावं, अशी मागणी अहमदनगर भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे केली आहे.

Maharashtra Politics 2024 : शिवसेनेवर नाराजी नाही, पण मेरिटवर जागा वाटप ठरलं होतं- विश्वजीत कदम

शिवसेनेवर आम्ही नाराज नाही पण लोकसभेच्या जागा वाटप मेरिटवर झालं पाहिजे हे ठरलं होतं. तसं झालं असतं तर ज्या एक दोन जागा भाजपला मिळाल्या त्या देखील मिळाल्या नसत्या., अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिली.

Indian Politics : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये अमित शहांच्या भेटीपूर्वी दिल्लीत बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक

प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू

अमित शाह यांच्या भेटीपूर्वी महत्वाची बैठक

राज्यातील अनेक विषय, मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर विषयावर चर्चा होण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र भेटत आहेत त्यामुळं त्यावरही चर्चा होण्याची शक्यता

Maharashtra Politics 2024 : भाजपच्या खासदार स्मिता वाघ, रक्षा खडसे अजित पवारांच्या भेटीला

भाजपचे जळगावचे खासदार अजित पवार यांच्या भेटीला

जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे भेटीसाठी पोहोचल्या

प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी दोन्ही खासदार दाखल

आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलो होतो

त्यांच्याशी राज्यातील कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही

फक्त आम्ही त्यांचे आभार मानले आणि निघालो, असं रक्षा खडसे म्हणाल्या

Central Railway : मध्य रेल्वे विस्कळीत, कसाराच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि आटगावदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे कसाराच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

 नाशिक शिक्षक मतदार संघात मविआकडून दोन अधिकृत उमेदवार

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात पुन्हा नवीन ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या संदीप गुळवे यांच्यानंतर काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी देखील पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरला आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात आता महाविकास आघाडीकडून दोन अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

उद्या दिल्लीमध्ये काँग्रेस खासदारांची‌‌ बैठक

उद्या संध्याकाळी ६.३० वाजता दिल्लीमध्ये काँग्रेस खासदारांची‌‌ बैठक असल्याची माहिती मिळत आहे.

PM Modi: नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीला

नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी यांच्या भेटीला गेले आहेत. अडवाणी यांच्या निवासस्थानी मोदी पोहोचले आहेत.

Pune Porsche Accident: सुरेंद्र आणि  विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

सुरेंद्र अग्रवाल व विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुस्ताक मोमीन याने तक्रार केली होती.

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड

पंतप्राधान नरेंद्र मोदी यांची NDAच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीला राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला. अमित शाह यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनत आहेत, त्यासाठीही शुभेच्छा दिल्या.

Mumbai News : पवई भीम नगर दगडफेक प्रकरण, 51 जणांना अटक

पवई भीम नगर दगडफेक प्रकरणी पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी 200 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पवई भीम नगर झोपडपट्टी अतिक्रमण काढण्यासाठी गुरुवारी पालिकेची टीम पोलिसांसोबत गेली होती. या कारवाईदरम्यान झोपडीधारकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 25 पेक्षा अधिक पोलीस आणि पालिका कर्मचारी जखमी झाले.

NDA Meeting : एनडीएच्या बैठकीला सुरुवात

एनडीएच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देखील हजेरी लावली आहे. मोदी आज सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचंही बोललं जात आहे.

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर

अजित पवार गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघातून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Pune News : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? समोर आली महत्वाची माहिती

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मकानदार आणि डॉ तावरे यांनी रक्त बदलण्याचा सल्ला दिला. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती.

कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेससोबत ठाकरे गटाचा उमेदवारीही अर्ज भरणार

कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेससोबत ठाकरे गट देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाकरे गटाकडून उमेदवार किशोर जैन हे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज सकाळी 11 वाजता कोकण भवन येथे भरणार आहेत. काँग्रेस कडून रमेश कीर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात

शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटात गेलेले ५ ते ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत. लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.A

Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले

उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतील खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार पोहोचले आहेत. खासदार सुनील तटकरे आणि छगन भुजबळ देखील सोबत आहेत. तसेच आज एनडीएच्या बैठकीला अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

Political News : छत्रपती उदयनराजे आणि पियूष गोयल यांच्या विजयानंतर राज्यसभेच्या २ जागा रिक्त, कोणाची वर्णी लागणार?

खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. या जागांवर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या जागी अजित पवार यांच्या पक्षाला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

Mumbai Rain Update : आज मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

आज मुंबई शहर व उपनगरात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच आज मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. समुद्रात भरती - दुपारी- १२:५० वाजता आहे. तर ४.६७ मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे.

 Beed News : बीडमध्ये वीज पडून 12 मेंढ्यांचा मृत्यू

बीडच्या माजलगाव तालुक्यातील हिवरा गावात वीज पडून तब्बल 12 मेंढ्यांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी नुकसान

वीज पडल्याने तब्बल 12 मेंढ्या मृत्युमुखी

2 लाख रुपयांचे नुकसान

Maharashtra Politics : प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाॅऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी इतकी आहे. गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीर पणे खरेदी केल्याचा त्यांच्या आरोप होता.

Ajit Pawar News : अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट होणार

NDA च्या बैठकीनंतर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीचा पराभव झाला, त्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती ठरविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाच्या वतीने एकाला मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. या पदासाठी प्रफुल पटेल यांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.