Today Marathi News : मोठी बातमी! एम. के. स्टॅलिन यांनी घेतली चंद्राबाबू नायडू यांची भेट

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (5 june 2024) : देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील राजकारण, लोकसभा निवडणुका निकाल, राज्यातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

मोठी बातमी! एम. के. स्टॅलिन यांनी घेतली चंद्राबाबू नायडू यांची भेट

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतली चंद्राबाबू नायडू यांची भेट

दिल्लीत दोन्ही नेत्यांची झाली भेट

चंद्राबाबू नायडू यांच्या विजयाबद्दल स्टॅलिन यांनी केल अभिनंदन

शुभांगी पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात ट्विस्ट अद्याप कायम

नासिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात ट्विस्ट अद्याप कायम

कडवट शिवसैनिक असल्याने उद्धव साहेबांच्या आदेशाचे पालन करीन मात्र...

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच...

शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरेंनी देखील सहमती दर्शवत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची केली विनंती

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरेंकडे मागितली दोन दिवसांची वेळ...

NDA तून शिवसेनेला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता

NDA ला समर्थन दिल्यावर शिवसेना ला दोन मंत्री पद?

शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद.

श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद देण्याच्या तयारी.

प्रतापराव जाधव सीनियर नेते तर श्रीरंग बारणे तीन वेळा निवडून आलेले खासदार.

वर्सोवा भागात अर्धा तासापासून वीजपुरवठा खंडित

मागील अर्धा तासापासून वर्सोवा भागातील बत्ती गुल,

तब्बल अर्धा तासाहून परिसरातील वीजपुरवठा खंडित

वर्सोवा भागातील सात बंगला, सागर कुटीर भागातील अनेक इमारती आणि झोपडपट्टी परिसरातील वीजपुरवठा खंडित

वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला हे अद्यापही स्पष्ट नाही

नागरिक उकाड्याने हैराण,

संजय राऊत -

या देशातील जनतेने संविधान बदलणाऱ्याना पराभूत केलं

अयोध्या, चित्रकूट या दोन्ही रामाच्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला

INDIA आघाडी विरोधी पक्षाची भूमिका निभावणार, खरगेंची पत्रकार परिषदेत माहिती

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने बहुमत दिलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडी संसदेत विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एनडीचंच सरकार केंद्रात असणार हे स्पष्ट झालं आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक सुरू

लोकसभा निवडणुकीत गेल्या दहा वर्षाच कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांना मोठं यश मिळालं आहे. बहुमत मिळालं नसलं तरी एनडीएला कडवी लढत देत २३४ जागावर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासंदर्भात आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दिल्ली इंडिया आघाडीची बैठक होत आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवारस्थानी ही बैठक होत असून घटक पक्षांचे नेते बैठकीच्या पोहोचले आहेत. खरगेंना या नेत्यांच स्वागत केलं आहे.

INDIA आघाडीला चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारांनी पाठिंबा द्यावा यासाठी ऑनलाईन पेटिशन

चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा द्यावा यासाठी ऑनलाईन पेटिशन

सोशल मिडीयात पेटिशन वायरल

लोकशाही वाचवण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती

७ जूनला एनडीएच्या खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक

७ जूनला एनडीएच्या खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक

बैठकीनंतर सर्व खासदार राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांना भेटणार

संध्याकाळी पाच ते सात या वेळेत सर्व खासदार राष्ट्रपतींना भेटणार

NDA मधील मित्रपक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी भाजपच्या ४ नेत्यांवर

जे पी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह, पियूष गोयल या चार प्रमुख नेत्यांवर जबाबदारी

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना एनडीएतील २१ नेत्यांचं समर्थन

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुतमत मिळालं असून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याआधी झालेल्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना २१ नेत्यांनी समर्थन दिलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. संध्याकाही सत्तास्थापनेसाठी एनडीएचे नेते राष्ट्रपतींना भेटण्याची शक्यता आहे.

शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

दीपक कदम नावाच्या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरून धमकी

गणपत गायकवाड ने चार गोळ्या घातल्या मी आठ गोळ्या घालेन -अशी दिली धमकी

महेश गायकवाड कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोचहले

काही महिण्याआधी हिल लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता गोळीबार

INDIA आघाडीची थोड्याच वेळात दिलीत बैठक 

थोड्याच वेळात INDIA आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक

बैठकीला नेते पोहोचायला सुरुवात

खरगे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

बैठकीसाठी पोहोचलेले नेते -

राहुल गांधी

अखिलेश यादव

संजय सिंह, आप

संजय राऊत, शिवसेना

तेजस्वी यादव, RJD

सीताराम येचुरी, CPI

ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स

Devendra Fadnavis : सरकारमधून मुक्त होण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजप नेत्यांनी केली चर्चा

संपूर्ण विचार करून निर्णय घेतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती

सरकारमधून मोकळ होण्याच्या निर्णयावर सद्या तरी देवेंद्र फडणवीस ठाम

Pre-Monsoon Showers : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

जिल्ह्याच्या काही भागात आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. कणकवली व वैभववाडी तालुक्यात पावसाने हजेरी लावली तर अन्य भागात काळोख दाटला होता. सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रचंड गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने हवेत गारवा निर्माण केला त्यामुळे या भागातील गर्मिने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला.

अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर? विश्वसनीय सुत्रांची माहिती

अजित दादांच्या नाराज आमदारांचे सुप्रिया सुळेंना संदेश

अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न

अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर?

किमान १० आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती

विश्वसनीय सुत्रांची माहिती

सांगली शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊसाची बॅटिंग 

सांगली शहरासह परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊसाने जोरदार हजेरी लागली आहे, शहरासह अनेक भागांमध्ये दमदार असा पाऊस पडला आहे. सकाळपासून सांगली शहरांमध्ये उकाडा वाढला होता,आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन जोरदार असा पाऊस पडला आहे. या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीचं तारांबळ उडाली. शेतकरीवर्ग मात्र सुखावला आहे.

NDA ची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू पोहोचले  बैठकीला

थोड्याच वेळात NDA chi बैठक सुरू होईल

७ लोककल्याण मार्ग वरील पंतप्रधान निवासस्थानी बैठक

बैठकीसाठी जे पी नड्डा पोहोचले

अमित शाह पोहोचले

नितीश कुमार पोहोचले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले

TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू पोहोचले

अजित पवार यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल पोहोचले

RLD प्रमुख जयंत चौधरी पोहोचले

Pune Porsche Car Accident :  बदललेले रक्ताचे नमुने शिवानी अग्रवाल यांचेच; फॉरेन्सिक अहवलातून माहिती समोर

शिवानी अगरवाल चे डी एन ए रिपोर्ट आले समोर

साम टिव्ही च्या हाती ब्लड रिपोर्ट प्रकरणी सर्वात मोठी अपडेट

बदललेले रक्त शिवानी अगरवाल यांचे

फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवलातून माहिती समोर

ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट

अल्पवयीन तरुणाच्या ऐवजी बदललेले रक्ताचे नमुने शिवानी अगरवाल यांचेच होते हे स्पष्ट

PM नरेंद्र मोदी राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी कार्यकाळाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

मुंबई पदवीधरसाठी शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज

मंबई पदवीधरच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाचे उमेदवार डॉ. दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Jayant Patil : जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर

जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत मेहबूब शेख देखील आहेत. तसेच नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे देखील ठाकरेंना भेटणार आहे.

पुण्यतील कल्याणीनगरात गॅस लाईन लिक होऊन स्फोट

पुण्यातील कल्याणीनगर येथे बिशप शाळेसमोरील एम.एन.जी.एल गॅस लाईन लिक झाल्याची घटना घडली. यानंत मोठा स्फोट झाला. या आगीवर अग्निशामन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

PM मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

राज्यात आमच्या पक्षाचा चांगला विजय झाला - शरद पवार

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

राज्यात आमच्या पक्षाचा चांगला विजय झाला आहे. पुढच्या रणनीतीसाठी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं आहे. नितीश कुमार यांच्याबाबत मला माहीत नाही. ते त्यांच्यासोबत राहणार असल्याचं त्यांचं विधान आहे.

ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : 'त्या' दोघांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडी

ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी ३ लाख रुपये दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून या दोघांना अटक केली. पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Nana Patole :  नागपुरात नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर नागपूरात लागले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस लोकसभेत मिळालेल्या यशानंतर बॅनर लावण्यात आले आहे. यावेळी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Pune Rain :  पुण्यात पावसामुळे दुकानदारांचं नुकसान, स्थानिक नागरिक आक्रमक

पुण्यातील काल झालेल्या पावसाने धानोरी परिसरात अनेक दुकानदारांचे नुकसान झालं आहे.

महानगरपालिकेने रस्त्यावरील राडाराडा दुकानासमोर टाकण्यात आला.

महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून राडाराडा न उचलता दुकानांसमोर टाकून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानिक लोकांनी रस्त्यावरील राडा बाजूला केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या विरोधाक आक्रमक भूमिका घेतली.

 Sharad Pawar News : शरद पवार गटाचे खासदार दिल्ली जाणार ?

शरद पवार गटाचे खासदार दिल्ली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार एकत्र येणार असल्याची माहिती आहे. आज पाच वाजता दिल्लीला जाणार आहे.

lok Sabha Election : चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीकडून चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

PM नरेंद्र मोदींनी मानले इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार मानले.

तिसऱ्यांदा NDAला बहुमत मिळाल्यामुळे मोदींचं अभिनंदन केलं होतं

विजयाचं श्रेय राहुल गांधींना जातं : नाना पटोले

लोकसभेतील विजयानंतर नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. न्याय यात्रा केली, त्यामुळे परिवर्तन झालं. जनता ही राहुल गांधी यांच्या पाठीशी उभी राहिली. ...हाच आनंद सगळ्यांना आहे. या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना जातं'.

पुण्यात SSC JE परीक्षेदरम्यान गोंधळ; उशिरा आलेल्या विद्यार्थांना केंद्राच्या गेटवर रोखलं

पुण्यातील हडपसरमध्ये SSC JE परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना केंद्राचा गेट आधीच बंद झाल्याने प्रवेश मिळाला नाही. हडपसर भागात सहयोग डिजिटल टीसीएस iqn या परीक्षा केंद्रावर केंद्र शासनाची परीक्षा होती. विद्यार्थी दूर वरून आले होते. केंद्रावर येण्यासाठी विद्यार्थ्यांना 1 ते 2 मिनिटांचा उशीर झाला. प्रवेशासाठी विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत गेट बंद केल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस बोलवून केसेस दाखल करू अशी धमकी दिली, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला.

लोकसभेच्या निकालानंतर PM मोदींच्या कॅबिनेटची पहिली बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटची आज पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आज सकाळी ११.३० वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार आहे.

भाजपमधील वरिष्ठ नेते आणि मंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आज संध्याकाळी होणाऱ्या NDA च्या बैठकीपूर्वी कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

Lok Sabha Election : दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक, शरद पवार दिल्लीला रवाना

दिल्लीत आज इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तातडीने आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Lok Sabha Election : गोंदिया भंडारा मतदारसंघात २५ वर्षांनी काँग्रेसने रोवला विजयाचा झेंडा

तब्बल पंचवीस वर्षानंतर गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांने आपला विजयाचा झेंडा रोवला

काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटोळे यांनी थेट लोकसभेत पाऊल टाकले आहे

पाटोळे यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष गोंदिया शहरात करण्यात आला

काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात या विजयाचा आनंद व्यक्त केला.

फटाके फोडून आणि गुलाल उधळून काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाला आहे. दादर, माटुंगा, सायन भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाची हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.