Today Marathi News: बीडच्या परळी परिसरातील पांगरीत ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको; रस्त्यावर जाळले टायर

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (18 june 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकीय घडामोडी, पोलीस भरती, छगन भुजबळ, महाराष्ट्रातील पावसाच्या लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv
Published On

OBC Reservation Protest :  बीडच्या परळी परिसरातील पांगरीत ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको; रस्त्यावर जाळले टायर

बीडच्या परळी परिसरातील पांगरीमध्ये ओबीसी आंदोलन आक्रमक झाले आहेत. रस्त्यावरच टायर जाळून बीड परळी महामार्ग बंद करण्यात आलाय. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पांगरी येथे हा रास्ता रोको करण्यात आला आहे. यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली असून"धनंजय मुंडे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है", "पंकजा मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है", "छगन भुजबळ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है", अशा घोषणाबाजी केली.

Ratnagiri - Mumbai Goa Highway:  रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वहाळ फाटा येथील उड्डाणपूल खचला

महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा काही भाग खचल्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय महामार्ग प्रशासनाने घेतलाय. तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र वाहतुकीस योग्य नसल्याने डांबरीकरण पुन्हा उकडून उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. मुंबई गोवा महामार्गावरील वहाळ फाटा येथील वाहतूक जुन्या मार्गावरून वळवली आहे.

Chhagan Bhujabal:  छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता

छगन भुजबळ यांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतलीय. भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Threat Call : नागपूरसहित देशभरातील 41 विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी

नागपूरसहित देशभरातील 41 विमानतळ उडवून देणारा धमकीचा मेल पुन्हा एकदा आलाय. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला हा धमकीचा मेल आला होता. त्यात नागपूरच्या विमानतळाचे नाव आहे. दुपारी 3 वाजता धमकीचा मेल आला होता. धमकीच्या मेलनंतर विमानतळ प्रशासन अलर्टवर आले आहे. दरम्यान कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सर्चमध्ये सापडली नसल्याची माहिती नागपूर विमानतळ प्रशासनाने दिलीय. काही महिन्याअगोदर देखील अशाच पद्धतीचा मेल विमानतळ प्रशासनाला आला होता.

Sadabhau Khot:  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीचं महायुती निवडणूक लढणार: सदाभाऊ खोत

घटक पक्ष म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असून आगामी विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीचं लढवणार, असा विश्वास माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे. राज्याचा चौफेर अभ्यास असणारे नेतृत्व घेरण्याचं काम प्रस्थापित वाडेवाले करत आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस हे लढणारे नेतृत्व आहेत. महाराष्ट्रातलं नेतृत्वचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि ते बारामतीकरांना ही माहिती आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय.

BJP Minister Meeting: भाजप कोअर कमिटी बैठकीपूर्वी राज्यातील कोअर नेत्यांची बैठक

राज्यातील कोअर नेत्यांची बैठक रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी होत आहे. दानवे यांच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात कोअर कमिटीच्या बैठकीसाठी दोन्ही नेते भाजप मुख्यालयात जाणार आहेत.

Raosaheb Danve: लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे करणार मराठवाड्याचा दौरा

रावसाहेब दानवे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्यात ते कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पक्षातील निरुत्साह दूर करण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्यावर आहे.

CM Shinde: टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना: मुख्यमंत्री शिंदे

टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय घेतला आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. हे मंडळ ज्यांना दुखापत झाली असेल त्यांना तात्काळ पन्नास हजार रुपयां मदत करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai Rain: मुंबई पश्चिम उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात

मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून दडी मारल्याने उकाड्याचे प्रमाण वाढले. आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असल्यामुळे उकडा देखील वाढला होता. मात्र साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या पश्चिम उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला आहे. उपनगरातील अंधेरी कांदिवली बोरिवली भागात रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis: वसई हत्याकांड प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल: गृहमंत्री फडणवीस 

वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे, असं ट्विट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Accident News:  छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; डांबर घेऊन जाणारा कंटेनर उलटला

डांबर घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याने अपघात झालाय. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. अपघातामुळे नगर संभाजीनगर महामार्ग ठप्प झालाय.

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी लातूरमध्ये कृती समितीचे धरणे आंदोलन 

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील नागपूर,कोल्हापूर आणि गोवा जोडणारा शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान त्यासाठी मागच्या काही दिवसांपूर्वी राजपत्र देखील जाहीर केले गेले आहे. दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग लातूर, जिल्ह्यातून जात असल्याने हजारो हेक्टर शेतजमीन या महामार्गासाठी जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी आज लातूर मध्ये मराठवाडा शक्ती पीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने लातूरच्या तहसील कार्यालयासमोर घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.

Ajit Pawar: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक संपन्न

राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. कबड्डी खेळ रूजवावा-वाढवावा व कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Nagpur News: घरात पाणी शिरल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांकडून मारहाण

नागपूरमध्ये काल झालेल्या पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या वादावरून भाजप माजी नगरसेवक दीपक चौधरीला नागरिकांकडून मारहाण झालीय. जुना सुभेदार भागात सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले यावरून नागरिकांसोबत दीपक चौधरीचा वाद झाला. वादाचे पूर्वसन वादात झाले आणि नागरिकांनी दीपक चौधरीला मारहाण केली यात दीपक चौधरीच्या डोक्याला दुखापत झालीय.

NCP :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला आगामी विधान परिषद निवडणुकीत 2 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला आगामी विधान परिषद निवडणुकीत 2 जागा मिळणार आहे. या दोन जागांसाठी पक्षात राजेश विटेकर, सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड इच्छुक आहेत. परभणीची लोकसभेची जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडताना त्या ठिकाणाहून इच्छुक विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं होतं. बीड जिल्ह्यातील काम पाहता संजय दौंड यांच्याकडून देखील विधान परिषदेसाठी आग्रह केला जात आहे. तर सुरेखा ठाकरे ह्या पक्ष संघटनेत सुरूवातीपासून काम करत असल्याने त्यांनी विधान परिषदेची मागणी केलीय.

Sushma Andhare: वसईमध्ये झालेल्या तरुणीची हत्या काळजाचा थरकाप करणारी, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया 

वसईमध्ये झालेल्या तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे. दिवसाढवळ्या तरुणीची अशी हत्या होते आणि लोक बघत राहतात हे सगळं चित्र विदारक आहे. मुंबईजवळ अशी घटना घडते, तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशी प्रतिक्रिया ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

PM Narendra Modi : मोदींच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, MSPबाबत निर्णय होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र यांच्या मंत्रिमंडळाची उद्या संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत MSPबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठीक रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

maharashtra legislative council : विधानपरिषदेची निवडणूक जाहीर, मतदान आणि मतमोजणीची तारीख ठरली

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १२ जुलैला मतदान आणि संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानपरिषद सदस्याची निवडणूक होणार आहे.

Dalai Lama News : अमेरिकन लोकप्रतिनिधींचं प्रतिनिधी मंडळ भारतात, धर्मशाळा येथे दलाई लामांची घेणार भेट

अमेरिकन लोकप्रतिनिधींचे पॉवरफुल प्रतिनिधी मंडळ भारतात पोहचले आहे. धर्मशाळा येथे दलाई लामांची भेट घेणार आहे. नॅन्सी पेलोसी, ग्रेगोरी मिक्स, अमी बेरा यांच्यासह एकूण सहा अमेरिकन नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दोन दिवस अमेरिकन शिष्टमंडळ धर्मशाळा येथे असणार आहे. अमेरिकन शिष्टमंडळाकडून दलाई लामांच्या भेटीनंतर चीनकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ देखील लक्ष्मण हाकेंची भेट घेणार

छगन भुजबळ देखील लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत. येत्या दोन दिवसांत छगन भुजबळ जालना जिल्हयातील आंदोलनस्थळी जाऊन हाके यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा देणार आहेत. समता परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हाके आणि मंगेश ससाणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता छगन भुजबळ आंदोलकांची भेट घेणार आहेत.

Mumbai News : पाकिस्तान प्रेम जपणारे देशद्रोही कोण? मनसेचा इशारा

क्रिकेट आणि इतर खेळांच्या माध्यमातून पाकिस्तानचे टी-शर्ट,साहित्य भारतात विकून पैसे कमावणाऱ्या कंपन्यांवर आणि खरेदी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेची आहे. त्यांच्या साहित्याची खरेदी केली, त्यांचा डेटाविषयी चौकशी करावी, अन्यथा हे साहित्य खरेदी करणाऱ्यांना घरात घुसून मारणार, असा इशारा मनसेने दिला आहे.

Pune : पुण्यात ओबीसी संघटनाकडून सगेसोयरे अधिसूचनेची होळी

पुण्यात ओबीसी संघटनांनी सगेसोयरे अधिसूचनेची होळी केली. सगेसोयरेची अधिसूचना रद्द करा, अशी ओबीसी संघटनांची मागणी आहे. पुण्यात ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मंगेश ससाणे यांचे उपोषण सुरु आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला ससाणे यांचं उपोषण सुरु आहे.

Neet Exam : नीट परीक्षा प्रकरण : नव्या याचिकेवर एनटीएला नोटीस

नीट परीक्षा प्रकरण : नव्या याचिकेवर एनटीएला नोटीस जारी करण्यात येत आहे. या याचिकेवर ८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Vinayak Raut : नारायण राणेंनी कपटनितीने विजय मिळवला, विनायक राऊतांची टीका

विनायक राऊत यांची आभार मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. कपटनितीने मिळवलेला विजय, अशी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यवर केली. 7 लाख मतदारांना 140 कोटींचे वाटप केला, असा आरोपही राऊत यांनी केला.

Police Bharti : पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन

पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटले आहे. पोलीस भरती संदर्भात मार्च २०२३ मध्ये काढलेल्या जी आर 4 महिने मुदत वाढ करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच मराठा प्रमाणपत्र SEBCन मिळल्याने आमचे अर्ज भरण्यात आले नाहीत, असाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

Pune Fire : पुणे-सातारा महामार्गावरील कंपनीला भीषण आग

पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाकाजवळील कंकू पेंट नावाच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. सुदैवाने कंपनीमधले कर्मचारी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.

अग्निशमाक दलाचे दोन बंब आणि स्थानिक पाण्याचे टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

Vinod Tawade : मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी असल्याची माहिती मिळत आहे. अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंनी विशेष रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. नोंदणीत पिछाडी असल्याने युवा मोर्चाला प्रचारात अधिक मेहनत घेण्याचा सल्ला तावडे यांनी दिला आहे. एका कार्यकर्त्याकडे २५ मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

रायबरेली लोकसभा जागा कायम ठेवत वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देण्याबाबत राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पत्र दिलं आहे. लोकसभा अध्यक्षांना राजीनाम्याच पत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे. कालच राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अडचणी वाढणार; इंडिया आघाडीचे खासदार सेबीकडे तक्रार करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत केलेल्या वक्तव्याचा अमित शहा यांना फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचे खासदार आज सेबीकडे सकाळी 11 वाजता तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे

Nilesh Lanke on police bharti : पोलीस भरती पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मागणी

राज्यात उद्यापासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. तसेच उमेदवारांचा सरावही झालेला नाही. त्यामुळे भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली.

Dharashiv News :  खासदार ओमराजे निंबाळकरग यांचा बॅनर अज्ञाताने फाडला

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बॅनर बार्शी तालुक्यातील आगळगावात अज्ञाताने फाडला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बॅनर फाडल्याने आगळगावातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. "फोन उचलल्यावर काय होतंय कळलं का.." असा आशय बॅनर होता. याबाबत अज्ञात व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी निंबाळकरांचे कार्यकर्ते करत आहेत.

Thane News : ठाण्यातील काँग्रेस नेते सचिन शिंदे यांचं दीर्घ आजाराने निधन, कार्यकर्त्यांवर शोककळा

ठाण्यातील काँग्रेसचे नेते आणि जिल्हा प्रवक्ते सचिन शिंदे यांचे पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. काँग्रेस पक्षाच आंदोलन तसेच मेळावा यामध्ये सचिन शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. आज मंगळवारी दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Nashik News : पूर्ववैमनस्यातून तिघांवर हल्ला, नाशिक लखमापूर परिसरातील घटना

नाशिकमध्ये भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या लखमापूर परिसरातील ही घटना आहे. हॉकी स्टिक आणि दगडाने तीन जणांवर भर रस्त्यात हल्ला केला. या हल्ल्यात सतीश भास्कर ,वैशाली भास्कर आणि जितेंद्र भास्कर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नाशिकच्या वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी मान्सून रेंगाळला

राज्यात अनेक ठिकाणी मान्सून रेंगाळला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पावसाची गरज भासू लागली आहे. आजपासून मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात २३ जूनपासून पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com