गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने VVPAT च्या १०० टक्के मोजणीच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. कोर्ट उद्या काय निर्देश देत हे पाहणं महत्वाचं ठरेल.
यवतमाळात जोरदार वादळवारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊ लागलाय.अनेक परिसरात वीज पुरवठा खंडीत झालाय.
ही निवडणूक देशात वृत्तीबदल झाली आहे, या वृत्तीच नाव भाजप आहे.
दोन्ही लोकसभा त्यांच्याबरोबर होतो. काही दिवसांत सत्ता बहुमताची काबीज केली. शिवसेना बरोबर होती.
तनमनाने आम्ही काम केलं. धन आमचं शिवसैनिक आहेत. महाराष्ट्र निवडणुकीत त्यांनी युती तोडली. केंद्रात बहुमताने आले म्हणून त्यांना महाराष्ट्र मध्ये बहुमत मिळेल असा वाटत होतं. 2014 ला त्यानी युती तोडली.
भाजप ची वृत्ती 2019 ला तशीच होती.
बाळासाहेब यांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे.
एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होती मोदींची सभा
परंतु आता पंतप्रधान मोदींची सभा होणार रेसकोर्सवर होण्याची शक्यता
पुण्यातील एसपी कॉलेज ऐवजी रेसकोर्सवर सभा ; संभाव्य गर्दी विचारात घेऊन मैदान बदलले
येत्या २९ एप्रिल रोजी नियोजित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सायंकाळी आयोजकांसमवेत रेसकोर्सची पाहणी केली
संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी रेसकोर्स मैदान जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून भायखळा विधान सभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांचे नाव जवळपास निश्चित.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला पसंती दिली.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आग अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पुणे पोलीस आणि गुन्हेगारात गोळीबाराचा थरार
कुख्यात गुंड नव्या वाडकरच्या गोळीबाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांचे गोळीबारानेच उत्तर
नव्या वाडकरच्या दिशेने पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या
एकही गोळी ह्या वाडकर ला लागली नाही
त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून नव्या वाडकरला केले जेरबंद
नव्या वाडकर सराईत गुन्हेगार
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी, चित्रा नक्षत्र, वसंत जित ऋतु या शुभदिवशी श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला जेजुरीनगरीत मोठी यात्रा भरते. विशेषत: या यात्रेस बहुजन बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने येतात. आज आलेल्या भाविकांकडून कुलधर्म कुलाचार करीत येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट असा खंडोबा देवाचा जयजयकार केला जात आहे.
पी. चिदंबरम म्हणतात सरकार आल्यानंतर सीएए रद्द करणार
मात्र भाजपचा शेवटचा कार्यकर्ता असेपर्यंत सीएएला हात लावू देणार नाही
देशाला जगातील तीसरी अर्थव्यवस्था बनवणार
रत्नागिरी - 26 तारीखपासून जिल्हा परिषद गटनुसार सभा
नारायण राणे नक्की विजयी होतील
सिंधुदुर्गमध्ये सुधीर सावंत नाराज असल्यास चर्चा करेन
विजय कोणत्याही एका पक्षाचा असणार नाही तो महायुतीचा असेल
धनुष्यबाण आणि कमळ एकत्र विजयी होणार आहे -
आम्ही 20 - 20 खेळणारे, धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची काळजी भाजप घेईल
अकोल्यातील भाजपच्या प्रचारासाठी येत असलेल्या अमित शहांच्या सभेवर पुन्हा पावसाचं सावट आलं. वातावरणाकील बदलासह पावसाला सुरूवात झाली आहे. आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर आज अमित शहां यांची सभा होतीय, अमित शहांची थोड्या वेळात सभा सुरू होणारेय. पाऊस आणि हवामानामुळे सभेसाठी आलेला नागरिकांचे प्रचंड तारांबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अकोल्यात पावसासह वाऱ्यामुळे सभास्थळीचा काही मंडप काही भागात उडाला होता..
आज दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे हानी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे शेगाव शहरात मुख्य रस्त्यावर व रेल्वे स्टेशन परिसरात अनेक झाडे उन्हाळून पडली असून तीन वाहने अडकली आहेत.
प्रवरा साखर कारखान्याच्या विज निर्मीती प्रकल्पाला आग...
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील घटना.
पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा वीजनिर्मिती प्रकल्प.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील साखर कारखाना...
काही वेळापूर्वी लागली भिषण आग..
सुदैवाने कुठलीही जिवीतहानी नाही..
आम्हाला विजयची खात्री आहे, पुढच्या उमेदवाराचे deposit राहील का नाही हीच शंका आहे, महायुतीकडून पुणे लोकसभेसाठी विश्वास
२७ एप्रिल रोजी मनसेचा पुण्यात सेंट्रल पार्क हॉटेल मध्ये होणार मेळावा
पुण्याला २५ तारखेलाच खासदार मिळून जातील, मनसे नेते बाबू वागस्कर यांना विश्वास
उद्या होणाऱ्या सभेवरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये प्रचंड खडाजंगी
सायन्स कोर मैदानावर पोलिसांसोबत वादावादी
मैदानावर प्रचंड पोलीस बंदोबस्त
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर बसला लागली आग
सटाणा-प्रतापूर याबस लागली आग
खिरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसने घेतला पेट
बस मध्ये एकूण 35 ते 40 प्रवाशी होते
बस पटल्याने प्रवाशांनी तातडीने गाडीतून बाहेर पडले
चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले
पेटलेली बस ची आग विझवण्याचा चालकाचा केविलवाणा प्रयत्न
सटाणा येथून अग्निशामक दलाल आग विझविण्यासाठी केले पाचारण
मात्र बस पूर्णतः जळून खाक
आगीचे कारण मात्र अस्पष्ट,मात्र शॉर्ट सर्किट ने आग लागल्याची शक्यता
मावा पेढ्याच्या नावाखाली बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत १९४४ किलो भेसळयुक्त मावा पेढा, हलवा मिठाई जप्त
जवळपास सहा लाख रुपयांची भेसळयुक्त मिठाई केली जाणार नष्ट
चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून सप्तशृंगी गडावरील ५ विक्रेत्यांवर एकाच वेळी छापे टाकून कारवाई
बच्चू कडू येणार असल्यांने अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलीसांनी केले बंद
मौदानावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात
सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे..
अमित शहा यांच्या सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे..
परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याने पोलीसांनी सर्व गेट बंद केले असून बच्चू कडू यांना गेटवरच थांबवतील का हे पाहावं लागेल..
बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे..
नारायण राणे दोनदा आमदारकिला पडले आहेत
या परिवाराला कोकणातील जनतेने नाकारलं आहे
नारायण राणे यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे त्यांनाही खात्री आहे की राणे निवडून येणार नाहीत
इकडचे स्थानिक नेते सामंत बंधू तेही त्यांना मदत करणार नाहीत, अशी आमची माहिती आहे
आमचे मुख्य प्रतिस्पर्धी विनायक राऊतच आहेत
10 वर्ष राऊत यांनी काहीच काम केलेलं नाही
त्यामुळे कोकणची जनता 100 टक्के आमच्या सोबत आहे
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसाने चांगलंच झोड़पलं आहे. वाऱ्याच्या अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल्याचं अनुमान लावल्या जात. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने हतबल झालाय. दरम्यान हवामान विभागांन अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिला होता, त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानात आजचा पाऊस काहिसा अकोलेकरांना दिलासादायक ठरणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाहीये. केजरीवाल यांच्या न्यायलयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढवण्यात आलीय. दुपारी २ वाजता VC द्वारे केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्याच्या कोर्टाच्या सूचना होत्या.
सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधींचा तुतारी चिन्हाचा आक्षेप फेटाळला आहे.
तुतारी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन वेगवेगळे चिन्ह असल्याचं आयोगाचे स्पष्टीकरण
त्यामुळे बारामतीतले अपक्ष उमेदवार युनुस शहा यांना तुतारी चिन्ह मिळणार
दोन्ही चिन्ह वेगवेगळी असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक देखभालीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण मार्गवरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यामुळे वाहन चालकानी आणि प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून एक पत्रक काढून करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग
1. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
2. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे
3. अंधेरी-घाटकोपर लिंक रोड (AGLR)
4. साकी विहार रोड
5. MIDC सेंट्रल रोड
6. हिरानंदानी लिंक रोड
7. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR)
8. सायन- वांद्रे लिंक रोड
'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेला काम दाखवावं. मुंबई पंचवीस वर्षे महानगरपालिका होती. त्यांनी केलेलं एक काम दाखवावं. तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही. यांचे भाषण ठरलेले आहे...उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, म्हणत उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लावला.
नाशिक लोकसभेचे इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी भेटीला पोहोचले आहेत.
राहुल गांधी सोलापूर आणि अमरावतीत घेणार सभा
तब्येतीच्या कारणास्तव देशातल्या प्रचार रद्द केला होता.
आता उद्यापासून पुन्हा सभा घेणार
अमरावतीत बळवंत वानखेडे यांच्यासाठी तर सोलापुरात प्रणिती शिंदेंसाठी सभा घेणार
- नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू
- २४ एप्रिल ते ०८ मे पर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू
- मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही
- स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई
- मनाई कालावधीत पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई
- ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक
- विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई
युवा सेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासारखा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत संजोग वाघेरे पाटील हे आपला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.
पुण्यातील क्रीडागृहामध्ये असलेल्या साहित्याला आग लागली.
पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळ येथील केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहामध्ये खेळाकरिता वापरल्या जाणाऱ्या साहित्यास आग
अग्निशमन दलाची ३ वाहनांसह जवानांकडून आग आटोक्यात
इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
या घटनेत सुदैवाने कोणाला ही इजा झालेली नाही
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाला मोठा दिलासा
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका नाही
हवामान खात्याने निवडणूक आयोगाला दिली माहिती
26 एप्रिल रोजी होणाऱ्या 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होणार आहेत तेथे हवामान सामान्य राहण्याची शक्यता
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची निवडणूक आयोगाला माहिती
नंदुरबार जिल्ह्यात वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या दोन वर्षापासून मोठा आर्थिक नुकसान होत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसानंतर उत्पन्न देखील घटले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला मिळत असलेल्या कमी भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड अशी वाढ झाली आहे. तसेच महावितरण कंपनीने शेतीपंपाचे वीजदर 12 टक्क्याने वाढवले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर पडणार आहे. महावितरण कंपनीने केलेल्या दरवाढी परत घ्यावे अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
विरारच्या दिशेला जाणाऱ्या वाहनाच्या रांगाच रांगा
पेल्हार फाटा ते विरार या ठिकाणी वाहतूक कोंडी
अनेक वाहने विरुद्ध दिशेने जात आहेत.
सध्या १०० पेक्षा अधिक किलोमीटरचा रस्ता नव्याने तयार करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
रात्री उशिरा ठाण्याच्या निवासस्थानी घेतली भेट
छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकमधून शिंदे गटाचा मार्ग झाला आहे मोकळा
खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित
मात्र नशिकमधून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा
येत्या दोन दिवसात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत.
लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी दि. २९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली.
मोदींच्या सभेला भाजपने सुमारे ६० हजार नागरिक जमण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यानुसार पार्किंग आणि वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सभास्थानी मोबाइल व्यतिरीक्त कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे.
जिल्ह्यांतून पाच जादा तुकड्या मागवण्यात आल्या आहेत.
याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणाही बंदोबस्तात असतील.
वसई किल्यातील बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे
२५ दिवसानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला
मागील २५ दिवसापासून वन विभाग बिबट्याचा शोधत होती
एका मोटरसायकलला धडक दिली होती तेव्हा पासून बिबट्या वसई किल्यात लपला होता
मात्र अनेक जाणकारानी बिबट्याच नाही एस मत व्यक्त केलं होतं.
आज पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला
अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद, राणा आणि बच्चू कडू यांचा वाद समोर
राणा बच्चू कडू वाद पुन्हा समोर
उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा आणि बच्चू कडू यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील एकाच ठिकाणी सभा...
बच्चू कडू यांनी सभेसाठी मैदान आधी आरक्षित केल असल्याचं सांगत असताना राणा यांच्याकडूनही सायन्सकोर मैदान आम्ही आरक्षित केल्याचा दावा..
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
रत्नागिरी - ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का
ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
रत्नागिरीतील पेठकिल्लामधील कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
महायुतीतीच्या कार्यालयात बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.