Breaking Marathi News Live : माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Maharashtra Latest News Updates : राज्यातील आणि देशातील संक्षिप्त बातम्यांचा आढावा.
Breaking News Live Updates in Marathi (30 January 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange Patil
Breaking News Live Updates in Marathi (30 January 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange PatilSaam TV
Published On

माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबाची भेट घेतली . यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला.

मुंबईतील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून समिती गठीत

मुंबईत घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस कडून मुंबई विभागासाठी समिती गठीत

मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह इतर १४ सदस्यांचा समितीत समवेश

मिलिंद देवरा पक्षाला सोडून गेल्यानंतर गठीत झालेल्या समितीला महत्व

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे त्यामुळं या समितीला महत्व

ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी महिनाभर लांबणीवर

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी महिनाभर लांबणीवर

१ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता

यापूर्वी ही सुनावणी २ फेब्रुवारीला लिस्टड झाली होती

मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सूनवणीच झालेली नाहीये... फक्त तारखांवर तारखा पडत आहेत

लोकसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता कमीच

मविआत कोणतेही मतभेद नाहीत : संजय राऊत

सकारात्मक चर्चा झालीय. नवनविन मित्र आम्हाला मिळालेत. मविआचा विस्तार झालाय. डाव्या आघाडीसह इतर छोटे पक्ष सामील झाले होते - वंचितचे तीन प्रमुख नेते पाठवले होते. आल्यापासून ते सोबत होते. आमच्यासोबत जेवण केेले त्यांनी. २ तारखेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील, मविआत कोणतेही मतभेद नाहीत.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीच्या संदर्भात अपडेट

राज्यातील सर्वेक्षण करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ

२ तारखेपर्यंत सुरू राहणार सर्वेक्षण

३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करायच होत सर्वेक्षण मात्र आज झालेल्या बैठकीत मुदतवाढ देण्याचा निर्णय

राज्य मागास वर्गीय आयोगाची आज ऑनलाईन बैठक पार पडली आहे

लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी सज्ज, उमेदवारांची केली घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील ८० पैकी १६ जागांवर समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. मैनपुरीमधून डिंपल यादव देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार असून काँग्रेसला ११ जागा देणार असल्याची घोषणा समाजवादी पार्टीकडून करण्यात आली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक :

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

पुढील महिन्यात 10 मार्चला होणार पुरस्कार प्रदान सोहळा

पुरस्कार सोहळ्याचे यंदा 17 वे वर्ष

लोकसेवा पुरस्कार शमसुद्दीन तांबोळी यांना जाहीर

चित्रपट विभागात आशुतोष गोवारीकर यांना पुरस्कार

ज्ञान-विज्ञान क्षेत्रात विवेक सावंत यांना, तर नृत्य क्षेत्रात सुचेता भिडे चपळगावकर यांना गोदावरी गौरव पुरस्कार

क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांना देखील पुरस्कार जाहीर

स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप

हिवाळ्यातच हिंगोलीतील धरणांतील पाणीसाठ्यात घट, भीषण टंचाईची भीती

हिंगोलीतील धरणांचा पाणीसाठा हिवाळ्यातच घटला, भीषण टंचाईची भीती

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही धरणांचा पाणीसाठा घटला

भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

मराठवाड्यात यंदाच्या वर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर येलदरी व ईसापूर या तिन्ही धरणातील पाणीसाठा घटला

तसेच हिंगोली जिल्ह्यातील लहान-मोठ्या 51 तलावांतील पाणीपातळीतही घट

भविष्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता जलतज्ज्ञांनी केली व्यक्त

भुजबळांच्या भूमिकेला माझं ओबीसी म्हणून समर्थन - वडेट्टीवार

छगन भुजबळांनी जी भूमिका मांडली त्याला माझं समर्थन आहे.

मी ओबीसी म्हणून त्यांना समर्थन देणार आहे

पक्ष वेगवेगळे आहेत, पण ओबीसी म्हणून आमची भूमिका एक

५ तारखेपासून चैत्यभूमीपासून इतर शक्तीस्थळांवर जाणार

पाच-सहा दिवस आम्ही या सर्व ठिकाणी जाणार

छत्रपती संभाजीनगर येथे २० फेब्रुवारीला आम्ही विराट सभा घेणार आहोत

त्यात आम्ही भुजबळांनाही आमंत्रण देणार आहोत

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, मराठवाड्यातील 43 शिक्षकांचा सन्मान

परभणी

परभणीत महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व जैन फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श उर्दू शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी अहमदपूरचे शिक्षक शेख मेहराज यांच्यासह मराठवाड्यातील 43 शिक्षकांना आदर्श उर्दू शिक्षक पुरस्कार माजी मंत्री फौजिया खान यांच्या हस्ते देण्यात आला.

PM मोदी फेब्रुवारीत पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पुण्यात येण्याची शक्यता, अद्याप निश्चित नाही

पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन, महात्मा फुले स्मारकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

CM एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत जाणार

येत्या आठवड्यात NDA ची बैठक होणार

बैठकीसाठी दोन्ही नेते दिल्लीत जाणार

लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत होणार अंतिम निर्णय

अमित शाह, नड्डा यांच्यासोबत होणार बैठक, सूत्रांची माहिती

IRS अधिकारी अमित दुआ ईडी कार्यालयात पोहोचले

ईडीच्या मुंबई विभागाचा अतिरिक्त संचालक म्हणून स्वीकारणार पदभार

ईडीचे आधीचे अतिरिक्त संचालक निखिल गोविला यांची बदली

थोड्याच वेळात अमित दुवा पदभार स्वीकारणार

वाशिम : पीक विम्यावरून ठाकरे गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी ऑफिसमधील खुर्च्या तोडल्या

पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारीवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

वाशिमच्या मालेगाव येथील पीक विमा कार्यालयातील खुर्च्या तोडल्या, कार्यालयातील बॅनर फाडले

शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी होत असलेला विलंब आणि अल्प प्रमाणात रक्कम जमा होत असल्याच्या तक्रारी

कार्यकर्त्यांनी पीक विमा अधिकाऱ्याला धरले धारेवर, कार्यालयातील बॅनरही फाडले

अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस हद्दीत तरुणाचा खून

अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस हद्दीत तरुणाचा खून

योगेश शेळके या ३५ वर्षीय शेतकरी तरुणाची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत हत्या

रात्रीच्या वेळी 4 जणांनी घरात घुसून केली हत्या

हत्येचं कारण अस्पष्ट, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही केली पाहणी

कोल्हापूरमधील काळमवाडी येथील पाईपलाईन योजनेला पुन्हा गळती

कोल्हापूरमधील काळमवाडी येथील पाईपलाईन योजनेला पुन्हा गळती

संतप्त शेतकऱ्यांनी गळतीच्या पाण्याने योजनेच्या अधिकाऱ्याला घातली आंघोळ

काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेला वारंवार गळती लागत असल्यामुळे शेतकरी संतप्त

माझ्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत - संदीप राऊत

कोरोना काळात पैशालाही कुणी हात लावत नव्हता, लोक उपाशी होते. अशात माणुसकीच्या नात्यानं मी मदत केली. तेव्हा तातडीनं मदत आवश्यक होती म्हणून कागदपत्रे केली नाहीत. राजेश साळुंखे यांनी माझ्याकडे मदत मागितली. माझ्याकडे सर्वकाही उपलब्ध होतं. त्यामुळे मी होकार दिला. हे सर्व केवळ राजकीय सूडबुद्धीने होतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांनी ईडी चौकशी प्रकरणात दिली.

भिवंडीत शिंदे गटाला मनसे देणार धक्का, पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत होणार प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडी आणि शहापूरमधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल

लोकसभा निवडणुकांच्या आधीच मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस दलातील १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

एक सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई पोलिस दलात करण्यात आल्या

बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती

नाशिक : इगतपुरीत बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

इगतपुरीत बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

31 वर्षीय मीनाक्षी शिवराम झुगरे या तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात केलं होतं दाखल

मात्र उपचारादरम्यान झाला मृत्यू, इगतपुरीच्या त्रिंगलवाडी परिसरात घटना

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

आंबेडकरांचा वाशीम जिल्हातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघात संवाद दौरा

मविआच्या बैठकीत वंचितचं शिष्टमंडळ करणार चर्चा

बैठकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोटनिवडणुकीबाबतही चर्चा होण्याची शक्यता

महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे उपस्थित राहणार 

शहापूरमध्ये शिंदे गटाला पुन्हा हादरा, जिल्हा उपसंपर्क मनसेत प्रवेश करणार

शहापूरमध्ये शिंदे गटाला पुन्हा हादरा

शिंदे गटाचे जिल्हा उपसंपर्क प्रमुख संतोष शिंदे हे आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मनसेत प्रवेश करणार

संतोष शिंदे शहापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष

येत्या काळात शहापूर तालुक्यात मनसेची ताकद वाढणार

सिल्लोड बाजार समिती निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या पॅनलला एकहाती सत्ता

छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना नेते आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी झाले. विरोधी भाजपाच्या पॅनलला एकाही जागेवर विजय संपादन करता आलेला नाही. बाजार समितीसाठी 28 जानेवारीला मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे 18 पैकी 18 सदस्य विजय झाले. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री सत्तार यांनी एकहाती सत्ता राखून आपल वर्चस्व प्रस्थापित केलंय.

शरद मोहोळ खून प्रकरण, गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

शरद मोहोळ खून प्रकरण

गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या गणेश मारणेला

सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिलाय

या प्रकरणात पाहिजे आरोपी असलेला आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला

मोहोळ खून प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत आतापर्यंत १५ आरोपींना अटक

गुन्हे शाखेची पथके गणेश मारणेचा कसून शोध घेत आहेत

पुणे जिल्ह्यासह शहराला जाणवणार पाणीटंचाई

पुणे जिल्ह्यासह शहराला जाणवणार पाणीटंचाई

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखरीक्षेत्रात केवळ 61 टक्के पाणी

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 17.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

तर या वर्षीच्या तुलनेत गतवर्षी खडकवासला धरण साखळी क्षेत्रात 21.18 टीएमसी पाणीसाठा होता शिल्लक

खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणात केवळ 61 टक्के पाणीसाठा शिल्लक

नागपुरातील टॅटू आर्टिस्टची इंडिया आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

नागपुरातील टॅटू आर्टिस्टची इंडिया आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

रितीक दरोडे असे टॅटूआर्टिस्ट तरुणाचे नाव

नागपुरातील टॅटू आर्टिस्टची इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

1001 जणांना मोफत जय श्री राम लिहिलेल्या टॅटूची काढून दिल्यान बनला रेकॉर्ड

रामल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग घेत रिटीकने मोफत काढून दिले होते टॅटू

इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड देत केले सन्मानित

राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

अल्पसंख्याक समाजासोबत आपण असल्याचा अजित पवार गटाकडून या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता

अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील दोन वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आत्ता राज्यसभेची सीट विधानसभा मतदारसंघांवर परिणामकारक ठरेल अशा व्यक्तीला देण्याची पक्षांतर्गत चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com