मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चारचाकी वाहन चालकांच्या पत्नीला लाभ मिळावा यासाठी नाशिकच्या नांदगाव येथे मनसे तर्फे मोर्चा काढण्यात येऊन तहसलदारांना निवेदन देण्यात आला.एकीकडे शासन एस.टी.बस प्रवाशी वाहतूकीमध्ये महिलांना अर्धे तिकीट सवलत दिल्याने खासगी वाहन चालकांचे आधिच कंबरडे मोडले आहे. त्यातच चारचाकी वाहनधारकांच्या पत्नीला या योजनेतून अपात्र ठरवून अपात्र ठरवून नाराज केल्याच मनसेने आरोप करत या योजनेचा लाभ चारचाकी वाहनधारकांना मिळावा, असे निवेदन दिले आहे.
शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील कोपर्डे गावातील घडलीय. सुहास आणि स्वप्निल पाटील या दोघा भावांची नावे आहेत.
विमानातून आता पक्षांची तस्करी होऊ लागली आहे. आज मुंबई कस्टम्स विभागाने सात जिवंत पक्षांची सुटका केली. याप्रकरणी जकार्तावरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ४ Lesser Bird of Paradise, २ Magnificent Riflebird आणि एक North Island Saddleback बॅगेत लपवून आणले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रतिभा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांची नियुक्ती केली.
पुणे भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यातील काँग्रेस भवनावर आंदोलन केले जात आहे. पुणे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बालगंधर्व चौकाजवळ अडवलं आहे.
अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांचा शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर पिंपरी-चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
चार दिवसाच्या प्रतिक्षेनंतर जोरदार पाऊस सुरू झालाय. पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळणार तर प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालया बाहेर गेल्या 3 दिवसापासून उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी हे विद्यार्थी गेल्या ३ दिवसांपासून उपोषण करत आहेत. तर या उपोषणकर्ते विद्यार्थ्यांच्या भेटीला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे पोहचले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्याबद्दल सरकारने तात्काळ विचार करावा, अन्यथा हा लढा मोठा होणार आहे. दरम्यान सरकार ओबीसीच्या प्रत्येक आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यासही आरोप वाघमारे यांनी केलाय.
भाजप आंदोलनाच्या पुणे पोलिसांचा काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काँग्रेस भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी झालीय. काँग्रेस भवन परिसरात कॉग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे.
सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन सुहास माने यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रहार संघटनेने केलेला आहे. त्याचसोबत आस्थापनेवर नसलेले प्रयोगशाळा सहाय्यक यांची नियुक्ती, अनेक लोकांच्या प्रतिनियुक्त्या, मेडिकल फाईलच्या टक्केवारीचे प्रकरण या सर्व गोष्टींसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. त्यामुळे सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक झाली.
झारखंडची राजधानी रांचीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. रांची येथे होत असलेल्या भारतीय आमदारांच्या बैठकीत त्यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आलीय असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते
मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजची सुनावणी पूर्ण झाली. मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून निर्माण झालेला पेच सुटला आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये खंड पडण्याची भीती अखेर टळली आहे. मागासवर्ग आयोगाला न्यायालयाने जारी केली नोटीस जारी केली आहे. 10 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत.
बहिणीला १५०० रुपये देण्यापेक्षा घरातल्या लोकांना रोजगार द्या, त्यातून येणार २०-२५ हजार रुपये येतील हे महत्त्वाचे आहे. गुजरातला रोजगार गेले ते परत आणा. माझ्या मतदारसंघात जी एमआयडीसी बनवली ती वनखात्याच्या जमिनीवर आहे, कशाला जनतेची फसवणूक करता, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
सव्वा दोन वर्षात १ लाख लोकाना नोकऱ्या दिल्या, ७० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत यापुढे टीसीएसच्या अधिकृत सेंटरवरच ही परीक्षा घेतली जाणार बाकी कोणत्याही ठिकाणी घेतली जाणार नाही . पेपर फुटीवर याच अधिवेशनात कायदा घेऊन येणाचा प्रयत्न करत आहे, ही माहिती खोटी असेल तर माझ्यावर हक्कभंग आणा, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मीरा-भाईंदर गुन्हे शाखा एकने एमडी ड्रग्सची आंतरराज्य तस्करी करणारी टोळी गजाआड केली आहे. या टोळीकडून ३२७ करोड ६९ लाख रुपयाचा एम.डी.(मॅफेड्रॉन)ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून तीन, तेलंगणा मधून तीन,उत्तर प्रदेश मधून आठ व गुजरात मधून एक अशा १५ जणांना अटक केली आहे. त्यासोबतच तीन पिस्तल एक रिव्हॉल्वर, ३३ जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.
अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्याबाबतच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी सभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा बैठकीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते बैठकीला उपस्थित आहे. त्यामुळे दानवेंचं निलंबन मागे घेणार का याकडे लक्ष लागलं आहे.
मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ८ अत्याधुनिक पिस्तूल आणि १३८ जिवंत काडतूस जप्त केली आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
रायगडमध्ये मुंबई- गोवा महामार्गावर कशेडी घाटात गॅस टँकर कलंडला. प्रशासकीय यंत्रणा आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी क्रमांक 245 येथे 40 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. 108 क्रमांकावर माहिती मिळतात तात्काळ कातोबा महाविद्यालय दिवे येथील डॉक्टरांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. प्रथमोपचार करून रुग्णांना पुढील उपचाराकरिता सासवड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर रमेश साळवे डॉक्टर गायकवाड डॉक्टर स्वप्नाली जेंगटे वाहन चालक संदीप एरंडकर वाहन चालक पारधी वाहन चालक सुनील जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून रुग्णांना प्रथमोपचार देऊन सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन आले
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा फेरविचार करावा. अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली. उपसभापतींना अंबादास दानवे यांनी पत्र पाठवले. शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनींचे प्रश्न मांडण्यासाठी निलंबनानचा फेरविचार करण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली. सर्व गटनेत्यांनी नीलम गोरे यांच्या दालनात बैठक सुरु आहे.
दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा यासाठी अहमदनगरमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अकोले तालुक्यातील कळस गावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तब्बल चार तासांनंतर रास्ता रोको आंदोलन संपले. आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्र्यांना गोठ्यातील शेण पाठवले.
पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना सरकारकडून टोल माफी करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असून राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत करण्यात आले आहेत. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत टोल माप असणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी क्रमांक 245 येथे 40 वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच तात्काळ कातोबा महाविद्यालय दिवे इथे रुग्णवाहिका पोचून प्रथमोपचार करून रुग्णांना पुढील उपचाराकरिता सासवड ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे. 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर रमेश साळवे, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर स्वप्नाली जेंगटे, वाहन चालक संदीप एरंडकर वाहन चालक पारधी वाहन चालक सुनील जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून रुग्णांना प्रथमोपचार देऊन सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन आले.
मीरा भाईंदर गुन्हे शाखा-१ ने मोठी कारवाई केली असून अंडरवल्डशी संबंधित असलेल्या आंतरराज्यायीय टोळीला गजाआड केले असून विविध राज्यातून १५ आरोपींना अटक केली आहे. यांच्याकडून ३२६ करोड ६९ लाख रुपयांचे एम.डी.(मॅफेड्रॉन) ड्रग्स हा अमली पदार्थही जप्त केले आहेत. वसई,हैदराबाद,तेलंगणा,वाराणसी उत्तरप्रदेश,ठाणे,मुंबई,अश्या एकूण १५ आरोपीनं अटक करण्यात आली आहे करोड रुपयांचे ड्रग्स सह तीन पिस्टल,एक रिवॉलर,३३ जिवंत काडतुस जप्त केले आहेत.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज मराठी आरक्षणावरुन चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही १३ जुलै पर्यंत वेळ मागितला आहे मनोज जारंगे याना मागितला आहे. सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्या सोबत बोलणं करून बैठक साठी माहिती दिली जाईल. मंत्रिमंडळ उपसमिती बैठक मध्ये अगोदर चर्चा केली जाणार आहे. आरक्षण टिकवण्यासाठी जे करणे गरजेच आहे ते आम्ही करणार, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून दोघांनी अर्ज भरला होता होता. त्यांचा अर्ज हा आज अर्ज पडताळणी समितीने बाद केला आहे. अजय सिंग सेंगर आणि अरुण जगताप या दोन्ही अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आला आहे आत्ता निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार आहेत.
"राष्ट्रपतींचे भाषण देशासाठी प्रेरणा होती. देशातील जनतेने तिसऱ्यांदा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आकडे आल्यापासून ते झेंडे घेऊन पळत होते.एक तीहाई सरकार असा ढोल काँग्रेसचे लोक पिटत होते. देशातील जनतेने परफॉर्मंस ला प्राथमिकता दिली आहे. गावचा सरपंच देखील न राहिलेला व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन काम करत आहेत.हे सगळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शक्य आहे. संविधान आमची सगळ्यात मोठी प्रेरणा राहिली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणूकीत मंत्री उदय सामंत आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अवैध ठरवला. उदय सामंत यांचा रत्नागिरीतून तर लंके यांचा अहमदनगरमधून अर्ज आला होता. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन निवडणुकीच्या मतदानासाठी अर्ज पाठवण्यात आले होते प्रत्येक जिल्हयातून ४ नावेही महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकरी मंडळ निवडणुकीच्या मतदानासाठी पाठवण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४ नावांप्रमाणे १०० जणांचे अर्ज महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडे आले होते. यातील ७ अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने अवैध ठरवले आहेत.
काल लोकसभेत बोलल्यानंतर आज पंतप्रधान मोदी हे राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. देशामध्ये सलग तिसऱ्यांदा आमचे सरकार आले असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच इथपर्यंत पोहोचलो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा या दोन मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात दरड कोसळली आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागात एका वळण रस्त्यावर भला मोठा दगड रस्त्यात कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चांदशैली घाटात वाहतूक सुरू असतानाच मला मोठा दगड रस्त्यावर कोसळला, मात्र सुदैवाने यात कुठलीही घटना घडलेली नाही. मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय पाहायला मिळाली. बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष मुळे या ठिकाणी नागरिकांचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर पडलेला दगड हातोड्याचा माध्यमातून फोडण्यात येत आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दरम्यान हे निलंबन मागे घेतलं नाही तर यापेक्षाही आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर आज आमदार नवाब मलिक विधान भवनात दाखल झालेत. यावेळी त्यांनी अजित पवारांना समर्थन देण्याच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. कोर्टाने मला मिडियाशी बोलण्यास मनाई केल्याचे मलिक म्हणाले.
लाडकी बहिण योजनेची घोष णा झाली मात्र पोर्टल अद्याप सुरूच नसल्याचे समोर आले आहे. योजनेची घोषणा झाल्यानंतर 1 तारखेला पोर्टल सुरू होणे अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंदच आहे. सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या या हंगामात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीनची उगवण देखील चांगली झाली आहे.बोरगाव खुर्द शिवारातील सोयाबीनच्या या पिकावर आता हिरव्या अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असून ही आळी सोयाबीनची पाने कुरतडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तहसील कार्यालय आणि सेतुं बाहेर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते . उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखले यासाठी नागरिकांनी पालघर तहसील कार्यालयाबाहेर देखील तुंबळ गर्दी केली असून या कार्यालयात ओसंडून गर्दी दिसून आली . आधीच शाळा सुरू झाल्याने नवीन प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची गर्दी असतानाच या योजनेची घोषणा सरकारने केल्यानंतर मोठी गर्दी वाढल्याच पहायला मिळतंय . मात्र ग्रामीण भागात हे अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महीलांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे .
बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येणारे साहित्य मिळत नसल्याने संतप्त बांधकाम कामगारांनी पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गच्या बाजूला गर्दी केली आहे. सोलापुरातील मुळेगाव येथे हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्गच्या बाजूला जमले आहेत. बांधकाम कामगारांना सुट्टीच्या दिवशी साहित्य घेण्यासाठी बोलावून साहित्य न दिल्याने कामगार आक्रमक
पालखी सोहळ्याच्या दिवशी संभाजी भिडे यांनी वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये, असे वादग्रस्त विधान केले होते. यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी भिडे यांच्या विरोधात आता काँग्रेसने पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. भिडे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी काँग्रेसचे फडके हौद चौकात आंदोलन सुरू आहे.
राज्य सरकारने दूध दराची घोषणा केल्यानंतरही दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले तालुक्यातील कळस गावात रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. रस्त्यावर बैलगाडी घेऊन आणि शेण ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. तर काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडण करत सरकारपर्यंत आपला आवाज पोहचवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते अजित नवले आणि अजित काळे हे देखील आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलकांनी कोल्हार घोटी महामार्ग अडवून धरला.Mumbai APMC Market: मुंबई मार्केटमध्ये ३०० टन बटाटा सडला, बाजार समितीकडून दुर्लक्ष
मुंबईमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये मागील आठवड्याभरात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठवलेला तब्बल 300 टन बटाटा सडला आहे. बटाट्याची मोठी आवक झाली. मात्र पावसामुळे बटाटा ओला झाल्याने हा बटाटा खराब झाल्याचे समोर आलेय. हा खराब झालेला बटाटा मार्केट आवारातच फेकून देण्यात येत असून एपीएमसी प्रशासनाकडून हा सडलेला बटाटा उचलण्यास दिरंगाई करण्यात येतेय. परिणामी हेच सडलेले बटाटे हातगाड्यामधे टाकून काही किरकोळ व्यापारी विक्रीसाठी नेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून एपीएमसी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी व्यापारी करत आहेत.
कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावरून यमाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली असून जेसीबीच्या साहाय्याने हटवण्याचे काम सुरू आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यात फ्लेक्स निलायम टॉकीज जवळ लागले राहुल गांधी यांच्या विरोधात फ्लेक्स राहुल गांधीच्या वक्तव्याला स्वामी विवेकानंद यांच्या वाक्याने उत्तर हिंदू हिंसक आहेत असं विधान राहुल गांधी यांनी केलं या वक्तव्याला स्वामी विवेकानंद यांचे वाक्य "खबरदार, हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल" असा बॅनर वर उल्लेख पुणे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी लावले बॅनर
सासवडमधून सोपान काकाच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. सोपान काका पालखीचा रथ फुलांनी सजवला. दर्शनासाठी मोठ्या वारकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. काही वेळात प्रस्थानाला सुरुवात होणार आहे.
ओबीसी समाजातील मते आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने पुन्हा मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपने एससी आणि एसटी पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री विजयकुमार गावित यांनीही मार्गदर्शन केलं.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहे. तसेच एनसीपी पक्ष ८५ जागा लढवेल, असं विधान अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरु केलं आहे. जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी आंदोलकांची आहे. या आंदोलकांनी रास्तारोको केला आहे.
हाथरस दुर्घटनेची मोठी अपडेट समोर आली आहे. हाथरस दुर्घटने प्रकरणी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंद केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत कार्यक्रमाच्या २२ आयोजकांवर गुन्हा केला केला आहे. घटना घडल्यानंतर भोले बाबा उर्फ सुरजपाल फरार झाला आहे.
NDA सरकारच्या काळातील संसदेचं पहिलं विशेष अधिवेशन आज संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. काल लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना राहुल गांधी यांचा बालकबुद्धी उल्लेख केला होता. राज्यसभेत देखील आज पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधी पक्ष आक्रमक राहण्याची शक्यता
नागपूरातील दीक्षाभूमी परिसरातील कुर्वेज मॅाडेल स्कुल या शाळेला आज सुट्टी देण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात काल ट्राफीक जामची मोठी समस्या निर्माण झाली होती.
पुणे जिल्हा शिष्यवृत्तीच्या परीक्षेत राज्यात अव्वल आला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा पुणे जिल्ह्याने बाजी मारली आहे. दोन्ही वर्गांच्या मिळून राज्य गुणवत्ता यादीतील पुणे जिल्ह्यातील ११६ पैकी तब्बल १०८ विद्यार्थी हे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत.
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एटीएसच्या तपासावर पानसरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. एटीएएसचे पुणे विभागाचे अधीक्षक जयंत मीणा यांच्याकडे 68 पानी लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनातून पानसरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेच्या सहभागाचे पुरावे असूनही हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.