Satara Earthquake: मोठी बातमी! साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के; मध्यरात्री नागरिकांची धावपळ, परिसरात घबराट

Satara Earthquake News: सोमवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला आहे.
 Breaking News 3-3 Richter Scale  earthquake in Satara koyna area
Breaking News 3-3 Richter Scale earthquake in Satara koyna areasaam TV

Satara Earthquake Latest News

सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोयना धरण परिसराला पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोमवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी तसेच वित्तहानी झाली नाही. (Latest Marathi News)

 Breaking News 3-3 Richter Scale  earthquake in Satara koyna area
Shivsena Case: विधानसभा अध्यक्षांना दिलेली मुदत आज संपणार; आमदार अपात्रतेचं काय होणार? आज 'सुप्रीम' सुनावणी

मात्र, अचानक भूकंपाचे धक्के (Earthquake) बसल्याने नागरिकांची धावपळ झाली. मध्यरात्रीच्या सुमारास अनेकजण घराबाहेर पडले. तर काहींनी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमद्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरण (Satara News) परिसराला पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत.

या भूकंपाच्या केंद्रबिंदूबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. ऑगस्ट महिन्यातही साताऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. १६ ऑगस्ट रोजी हा भूकंप झाला होता. मोठा आवाज होऊन जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आज पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात भूकंप झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com