देशात एलपीजी सिलिंडरचा काळा बाजार फोफावला; ग्राहक भारतीने केले 'हे' गंभीर आरोप

एकीकडे किमती वाढत असताना देशभर एलपीजी सिलिंडरचा काळा बाजारही (Black Market ) मोठ्या प्रमाणात फोफावल्याची माहिती समोर आली आहे.
Gas cylinder
Gas cylinderSaam Tv
Published On: 

मंगेश मोहिते

नागपूर : देशभरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळं महागाईच्या झळा देशातील सर्वसामान्यांना बसत आहेत. एकीकडे किमती वाढत असताना देशभर एलपीजी सिलिंडरचा काळा बाजारही (Black Market ) मोठ्या प्रमाणात फोफावल्याची माहिती समोर आली आहे. एलपीजी सिलिंडरचा (Gas cylinder) काळा बाजाराला रोखण्यासाठी गॅस कंपन्या आणि केंद्र सरकारने या प्रकाराची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी ग्राहक भारतीने केली आहे. (Nagpur Latest Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

देशभरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्यासोबत देशात घरगुती वापराच्या एलपीएजी सिलिंडरचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या काळया बाजारात गॅस वितरक एजन्सी, गॅस कंपन्या व खासगी लोकांचा सहभाग असल्याचा आरोप ग्राहक भारती या स्वयंसेवी संघटनेने केला आहे. उज्वला योजनेतील सिलिंडरचा सर्वात अधिक दुरुपयोग होत असल्याचाही आरोप ग्राहक भरारीने केला आहे. तसेच ९ मे रोजी नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाणे परिसरातील महाकाली नगर येथे याच एलपीजी सिलिंडरच्या काळया बाजारामुळे आग लागल्याचा दावा देखील ग्राहक भारतीने केला आहे.

Gas cylinder
दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई करा, भाजप महिला मोर्चाची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान, ग्राहक भारतीचे अध्यक्ष अॅड. विनोद तिवारी यांनी सिलिंडरच्या काळा बाजारावर प्रतिक्रिया दिली आहे. तिवारी म्हणाले, 'ग्राहकांच्या हक्काचे सिलिंडर हे व्यावसायिक व असामाजिक तत्वाच्या लोकांकडे असून सामान्य जनतेची या माध्यमातून लूट होत आहे. घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरण्याचा अवैध धंदा जोमात आहे'. 'या धंद्यामुळे नागपूरच्या बेलतरोडी भागातील महाकाली नगरात भीषण आग लागली' , असा दावा देखील विनोद तिवारी यांनी केला. एलपीजी सिलिंडरच्या या काळ्या बाजाराविरुद्ध गॅस कंपन्या व सरकारने पावले उचलावी, अशी मागणी ग्राहक भारतीने केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com