Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

BJP Targets Shinde And Ajit Pawar: भाजपनं आपल्या सत्तेतल्या कुबड्या काढण्याची जोरदार तय़ारी सुरू केलीय....शिंदे आणि अजितदादांना रोखण्यासाठी पुणे आणि ठाण्यात काय रणनीती आखलीय? कोणते शिलेदार मैदानात उतरवले आहेत?
BJP intensifies its Maharashtra strategy key leaders assigned to counter Ajit Pawar in Pune and Eknath Shinde in Thane
BJP intensifies its Maharashtra strategy key leaders assigned to counter Ajit Pawar in Pune and Eknath Shinde in ThaneSaam Tv
Published On

ऐकलंत...अमित शाहांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आता भाजप जोरदार तयारीला लागलंय. या कुबड्या काढण्याची सुरूवात भाजपनं अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातून आणि शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यातून केलीय. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती आखण्यात आलीय. पुण्यात अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपने 5 मातब्बर नेते मैदानात उतरवले आहेत..पुण्यात कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी सोपवलीय

भाजप अजितदादांना रोखणार?

पुणे जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार

संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी मंत्री मुरलीधर मोहोळांवर

गणेश बिडकर, शंकर जगतापांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी

मावळ भागातील निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगेंवर

आमदार राहुल कुल यांच्यावर बारामतीची जबाबदारी देण्यात आलीय.

दुरीकडे ठाण्यातही भाजपने निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी जाहीर झालीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात भाजपनं कोणते शिलेदार मैदानात उतरवले आहेत

बालेकिल्ल्यातच भाजप शिंदेंना घेरणार?

शिंदेंच्या ठाण्यात भाजपचे निवडणूक प्रभारी गणेश नाईक

ठाणे शहराची जबाबदारी आमदार संजय केळकरांवर

ठाणे ग्रामीणची जबाबदारी माजी खासदार कपिल पाटलांवर

भिवंडीची जबाबदारी आमदार महेश चौघुलेंकडे

मिरा भाईंदरची जबाबदारी आमदार नरेंद्र मेहतांकडे

नवी मुंबईची माजी खासदार संजीव नाईकांकडे

कल्याणची जबाबदारी नाना सुर्यंवशी यांच्याकडे

उल्हासनगरची जबाबदारी प्रदीप रामचंदानींकडे यांच्यावर सोपवलीय.

भाजप आगामी काळात हीच रणनीती राज्यभर राबवणार आणि मित्रपक्षांच्या कुबड्या काढून फेकणार हा खरा प्रश्न आहे. तर

महायुतीत राहूनच भाजपच्या या रणनीतीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार कसं तोंड देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com