भाजपकडून विविध राज्यातील प्रभारी - सहप्रभारी यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ३ नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी कायम आहे. तर राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर प्रभारीपद, माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच प्रभारीपद कायम ठेवण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने संघटनात्मक बदलांना सुरुवात केली असून देशातील २४ राज्यांत नवे प्रदेश प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीनंतर जून २०२५ मध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये विनोद तावडे यांचा मोलाचा वाटा आहे. ४० पैकी एनडीए आघाडीला तीस जागा मिळाल्या आहेत. संघटनात्मक कौशल्यामुळे तावडे यांना प्रभारीपदी कायम ठेवण्यात आलं आहे.
भाजपने यावेळी लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. दक्षिणेत खातं उघडण्यात भाजपला यश आलं. थ्रिसूर मतदारसंघातून सुरेश गोपी विजयी झाले आहेत. गेली २ वर्षे प्रकाश जावडेकर केरळमध्ये संघटनात्मक बांधणी करत होते. त्यांच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत यश आलं. त्यामुळे त्यांच्याकडे केरळचे प्रभारी पद कायम ठेवण्यात आलं आहे.
वर्षभर वांशिक हिंसाचारामुळे अत्यंत संवेदनशिल आणि तणावग्रस्त असलेल्या मणिपूर भाजपचे प्रभारी म्हणून भाजपचे नांदेडचे नेते व राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांची नियुक्ती झाली आहे. तस संबित पात्रा यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांच्या समन्वयक पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर पंजाबचे नवे प्रभारी म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.