भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

BJP Municipal Election Candidate Strategy: महापालिकेसाठी उमेदवारी मिळण्याच्या आशेने भाजपात डेरेदाखल झालेले आयाराम भाजपच्या खेळीनं हवालदिल झालेत...कारण भाजपच्या बैठकीत उमेदवारासाठी नवा पॅटर्न तयार केल्याची माहिती समोर आलीय.
BJP leaders discussing candidate selection strategy ahead of municipal elections
BJP leaders discussing candidate selection strategy ahead of municipal electionsSaam Tv
Published On

उमेदवार निश्चित करताना भाजप आणि संघातील प्रमुखांची मतं विचारात घ्या

सर्वसंमतीने उमेदवार ठरवा

पालिकेचा प्रचार व्यक्तीकेंद्र न ठेवता पक्षकेंद्री बनवा

प्रचारात पैशांची उधळपट्टी थांबवा

भाजपच्या दृष्टीने ए आणि ए प्लस निष्ठावंत तरुणांना संधी द्या

हमखास जिंकण्याची क्षमता असलेल्या जागेवर आयात उमेदवार लादू नका

विजयाचा विश्वास आहे पण शंभर टक्के खात्री नाही, अशा जागांसाठी आयारामांचा विचार

एकाच घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त तिकीटं देऊ नका

खरंतर गेल्या काही दिवसात राज्यात महाविकास आघाडीच नाही तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अनेक नेते भाजपात दाखल झालेत....त्यात एकाच कुटुंबातील दोन जण इच्छूक आहेत...मात्र आता भाजपच्या नव्या रणनीतीमुळे भाजपात प्रवेश केलेल्या इच्छूकांचं टेन्शन वाढलंय

उमेदवारीच्या आशेने भाजपात प्रवेश केल्यानंतरही आता उमेदवारीची गॅरंटी नसल्याने आयारामांची धाकधूक वाढलीय...त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते निष्ठावंतांना न्याय देणार की आयारामांपुढे लोटांगण घालणार.... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..कारण पक्षाचा आदेश असतानाही स्थानिक नेत्यांनी निष्ठावंतांना डावललं तर निष्ठावंतांवर फक्त सतरंज्या उचलत राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही... आणि त्यामुळे निष्ठावंतांचं मनोबल खचण्याची शक्यता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com