Pritam Munde News: 'पंकजाताईंना राजकारणातील तुरटी व्हायचंय, तसं मला...'; भाजप खासदार प्रीतम मुंडेंचं सूचक विधान

Pritam Munde News: प्रीतम मुंडे यांनी मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असं सूचक विधान केलं आहे.
Pritam Munde News
Pritam Munde NewsSaam tv
Published On

Pritam munde News:

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमाच्या दरम्यान मला राजकारणातील तुरटी व्हायचंय, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या भगिनी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असं सूचक विधान केलं आहे. (Latest Marathi News)

'समाजात मानसिक अपंगत्वच नाहीतर समाजात व्हायरल इन्फेक्शन झालेल्या प्रवृत्ती वाढत आहेत. त्या खूप वेगाने वाढत आहेत, आपण जिकडे तिकडे पाहतोय. त्यामुळे माझ्यातील डॉक्टर कधीकधी जागा होतो, त्यामुळं अशा प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असं मोठं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं. त्या बीडच्या परळीमध्ये दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pritam Munde News
Manoj Jarange Patil: 'आपलेच लोक आपल्या अंगावर घालण्याचा प्रयत्न...' जरांगे पाटलांचे सरकारवर गंभीर आरोप

प्रीतम मुंडे म्हणाल्या, अपंगत्व हे शारीरिक आणि मानसिक असतं. काही लोकांना मानसिक अपंगत्व आलं आहे. मात्र त्यांना अपंगत्व आलं नाही तर त्यांना इन्फेक्शन झालं आहे. ज्याची साथ सध्या सुरू आहे'.

'व्हायरल इन्फेक्शन यासाठी म्हणते, की कारण व्हायरल जे असतात ना, त्यांचे विशेष गुणधर्म असतात. ते थोड्याच वेळामध्ये फार मोठ्या पटीने वाढतात. आता 1 असेल तर 10 मिनिटात 100 होतील, त्यांचा वेग फार असतो. त्यामुळं समाजातील अशा प्रवृत्ती फार वेगवान स्वरूपात वाढत आहेत, असे प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या.

'समाजातील या प्रवृत्तीमुळे ताई काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या, मला राजकारणातील तुरटी व्हायचंय. तर मी म्हणते मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असंही यावेळी त्या म्हणाल्या.

'पांढऱ्या पेशींचे काम असते की शरीरात प्रवेश केलेले आणि शरीराला त्रासदायक असणारे विषाणू नष्ट करणं. त्यामुळं माझ्या सारख्या जास्तीत जास्त पांढऱ्या पेशी या राजकारणात निर्माण व्हाव्यात ही भावना व्यक्त करते, असंही यावेळी त्या म्हणाल्या.

Pritam Munde News
Manoj Jarange News: 'मला बोलू द्या, अन्यथा...'; मनोज जरांगेंच्या भाषणावेळी तरुणाचा स्टेजवर गोंधळ

प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या, उदाहरण देणं गरजेचं होतं, कारण अधूनमधूम माझ्यामधील डॉक्टर जागी होत असते. त्यामुळं कुणावर टीका टिप्पणी करणं हा काही हेतू नव्हता. आम्ही अठरा पगड जातीसाठी काम करणारे आहोत. आमचे कोणतेही कार्यक्रम दाखवण्यासाठी नसतात, दाखवण्यासाठी जो कार्यक्रम घेतो तो पेशंट कुठं आहे? हे पाहण्यापेक्षा आपला फोटो कसा चांगला येईल, याकडं लक्ष देतो, असे चम्पू पुढारी तुम्हाला भरपूर मिळतील'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com