
चंद्रपूर : मुंबईतील भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या 'क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' ने चंद्रपूरChandrapur जिल्ह्यातील सुमारे दोनशे कामगारांचे 9 महिन्यांचे वेतन थकविल्याची माहिती समोर आली आहे.BJP MLA Prasad Lad's company has not paid workers for 9 months
कामगारांचे वेतन थकवल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. पीडित कामगारांनी मनसेकडेMNS याबाबत तक्रार केली आहे. कामगारांच्या मुलाबाळांसह, अपंग नातलगांना सोबत घेत मनसे शिष्टमंडळ सहाय्यक समाजकल्याण आयुक्त अमोल यावलीकर यांच्या कार्यालयात धडकले व संबंधितांचा समाचार घेतला.
हे देखील पहा-
सामाजिक न्याय Social justiceव विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध इमारतींची साफसफाई- सुरक्षा व्यवस्था तसेच बाग काम बाह्य स्रोताद्वारे करण्याचे कंत्राट मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, Crystal Integrated Services Pvt. Ltd., मुंबई या कंपनीला मिळाले आहे. या विभागांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय इमारती, Goverment Buildingवस्तीगृहHostel, निवासी शाळाschool आदी ठिकाणी जवळपास 200 कामगारEmploys मागील 8 वर्षापासून समाज कल्याण विभाग व इतरत्र कार्यरत आहेत. मात्र त्यांना डिसेंबर 2020 पासून कंपनी तर्फे वेतन देण्यात आलेले नाही; तसेच एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाहPF निधीही कंपनीतर्फे जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
थकीत वेतनाच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ सामाजिक न्याय विभाग कार्यालयात पोचले. मनसेने कंपनी विरोधात तक्रार करत सात दिवसाच्या आत कामगारांचे वेतन अदा करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा आयुक्तांना इशारा दिला. एकीकडे 200 कामगारांचे वेतन थकीत असताना याच कंपनीच्या मंत्रालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र नियमित होत आहे.
Edited By -Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.