महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याच्या इशाऱ्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Sangli Politics : भाजप आमदार गोपीचंद पाडळकर यांच्या इशाऱ्या’मुळे सांगलीत राजकीय तणाव निर्माण झाला आहे. विरोधी त्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Sangli Politics :
BJP MLA Gopichand Padalkar’s statement on ‘correcting’ political opponents by 2029 creates a stir in Sangli politics.:saam tv
Published On
Summary
  • भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे सांगलीत राजकीय वातावरण तापलं

  • विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

  • जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू

विजय पाटील, साम प्रतिनिधी

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला असताना सांगलीमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे. पुढील काळात सांगलीमधील नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

Sangli Politics :
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शरद पवार यांचं मोठं विधान

सांगली जिल्हा परिषदेतल्या पराभवानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटलांनी हा इशारा दिला आहे. जतचे अध्यक्षपद ज्यांनी-ज्यांनी घालवल आहे, त्यांचा-त्यांचा कार्यक्रम होणार, हे जाहीरपणे सांगतो,असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटलांना दिला आहे. जतचे अध्यक्षपद घालवणे एवढं सोपं नाही

Sangli Politics :
Prajakta Tanpure : तनपुरेंनी उमेदवारी अर्ज का भरला नाही? फडणवीसांचे नाव घेत सांगितलं कारण...

तसेच विशाल पाटील पुढचे खासदार नसणार त्यासाठी आपण जीवाचं रान करू आणि 2029 मध्ये सगळ्यांचा कार्यक्रम करू,असा गर्भित इशारा देखील पडळकर यांनी माध्यामांशी बोलताना दिला आहे. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ होणार असल्याची चर्चांवर भाष्य केले. जिल्ह्यात दोन लोकसभा होणार आहेत, अशा बातम्या ऐकू येत आहेत, तज्ज्ञ सांगत आहेत. त्यासह विधानसभेची सदस्य संख्याही वाढणार आहे.

२०११च्या जनगणनेसह अडीच लाख मतदारांची संख्या होईल. त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये बरेच विधानसभेचे मतदरासंघ वाढतील. सांगलीमधील खासदारकी बोलताना पडळकर म्हणाले पुढील खासदार कोण होईल हे माहिती नाही, पण ज्यांच्यामुळे जतचे अध्यक्षपद गेलंय, त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार. लोकसभेसाठी सांगलीमध्ये राखीव असेल तरी विशाल पाटील हे पुढे खासदार म्हणून दिसणार नाहीत. त्यासाठी मी लोकांमध्ये जाईल. लोकांचे काम करेल.

2029 मध्ये सांगली जिल्ह्यात भाजपाचे खासदार झाले पाहिजे. दोन्ही ठिकाणी भाजपचे खासदार झाले पाहिजे,अशी शपथ घ्या,असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com