अकोट नगरपालिकेत पुन्हा भाजप–एमआयएम युती उघड
एमआयएमच्या मतांवर भाजप नेत्याचा मुलगा स्वीकृत नगरसेवक
आमदार प्रकाश भारसाकळेंनी पक्षाशी संबंध नाकारले
राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा आणि वाद सुरू
अक्षय गवळी, अकोला
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक काल पहायला मिळाला होताय. अकोट नगरपालिकेत 'एमआयएम'कडून स्विकृत नगरसेवकपदी भाजपा नेते आणि अकोटचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांची निवड करण्यात आलीय. 'एमआयएम'च्या पाचही नगरसेवकांनी भाजप नेत्याच्या मुलाला स्विकृत नगरसेवक पदासाठी समर्थन दिलंय. अकोटमध्ये झालेल्या 'भाजप-एमआयएम' युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होताय. मुख्यमंत्र्यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले होतेय. तर या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली होतीय. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता.
पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर काल परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात परत आलीय. काल स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत 'भाजप-एमआयएम' युती वेगळ्या रूपात समोर आलीय. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी ताज राणा यांचं नाव आलं होतंय. यासोबतच एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आला नाहीय. त्यामूळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया हे एमआयएमचे स्विकृत नगरसेवक होण्याची शक्यता आहेय. आज अकोट नगरपालिकेत उपनगराघ्यक्षासह 4 स्विकृत सदस्याची निवड आणि घोषणा होणार आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हात वर केलेत. बरेठिया पिता-पुत्राचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणालेय. रामचंद्र बरेठिया भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहेय. बरेठिया पिता-पुत्रांचा भाजपशी असलेला संबंध आणि आमदार प्रकाश भारसाकळेंशी असलेल्या जवळीकीचे पुरावेच 'साम मराठी'च्या हाती लागलेत. या पुराव्यांमूळे आमदार भारसाकळे यांच्या दाव्यातील हवा निघणारेय.
दरम्यान, केवळ साजिद इनामदार यांनाच पाठिंबा दिल्याचे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी एमआयएमकडून साजीद इनमादार यांचे नाव सुचवले आहे. जितेंद्र बरेठिया यांना एमआयएमने पाठिंबा दिलेला नाही, असेही एमआयएम कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.