BJP Political News : लोकसभेच्या 'मिशन ४५'साठी भाजपचा बैठकांचा सिलसिला सुरु, नवा पॅटर्न राज्यातही राबवला जाणार?

BJP Meeting over Loksabha Election 2024 :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नेते विनोद तावडे व पंकजा मुंडे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
PM Modi- Devendra FAdnavis
PM Modi- Devendra FAdnavisSaam TV
Published On

सूरज मसूरकर

Nagpur News :

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मिशन ४५ साठी भाजपकडून सर्व पर्यायांची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी भाजपच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. उद्या भाजप कार्यसमितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी या गावात ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नेते विनोद तावडे व पंकजा मुंडे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीत लोकसभेच्या तयारीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. (Latest News)

PM Modi- Devendra FAdnavis
Loksabha Election: फक्त ५५ दिवस शिल्लक, कामाला लागा! नागपूरच्या बैठकीत आमदारांना काय देण्यात आले आदेश?

भाजप यशस्वी पॅटर्न राबवणार?

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपने एक प्रयोग केला, तो यशस्वी देखील झाला. लोकप्रिय चेहरे असलेले केंद्रीय मंत्री आणि खासदारांना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उतरवलं होतं. भाजपच्या हा नवा प्रयोग यशस्वी झाला. तोच प्रयोग महाराष्ट्रात देखील राबवला जाऊ शकतो.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रात मोदी सरकार बहुमताने पुन्हा सत्तेत आणायचं असेल तर भाजपला तशी करावी लागणार आहे. महाराष्ट्र महत्वाचं राज्य असल्याने तिथे भाजपने जोर लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपसोबत शिंदे गट, अजित पवार गट अशी ताकद आहे. त्यामुळे ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. त्यासाठी भाजपकडून वजनदार नेते लोकसभा निवडणुकीत उतरवले जाऊ शकतात.

PM Modi- Devendra FAdnavis
Maratha-OBC Reservation : महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा; मागासवर्ग आयोगात याचिका

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राज्यसभेवर असलेल्या काही बड्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं. पंकजा मुंडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. याशिवाय तरुण चेहऱ्यांना देखील संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com