Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?

Pankaja Munde At Bhagwangad: भगवान गडावरील दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर चांगल्याच चिरडल्या. कुणाची सुपारी घेऊन आलात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?
Pankaja Munde saam Tv
Published On

मंत्री पंकजा मुंडे यांची बीडच्या भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाषण करत असताना पंकजा मुंडे उपस्थित कार्यकर्त्यांवर संतापल्या. 'माझा भगवान गडावरील मेळावा काढून घेतला गेला. तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आला आहात माहिती नाही.', असे म्हणत पंकजा मुडे बेशिस्त कार्यकर्त्यांवर संतापल्या.

पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्या असता कार्यकर्ते गोंधळ घालत होते. त्या बोलत असताना जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शांत बसा असे सांगून देखील ते शांत बसत नव्हते. त्यानंतर पंकडा मुंडे त्यांच्यावर चांगल्याच संतापल्या. 'भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटत आहे. तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. गोंधळ घालणाऱ्यांनी कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही. कारण अशी बेशिस्ती मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती.'असे म्हणत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर चिडल्या.

Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?
Dasara Melava: आयुक्तांनी लक्षात ठेवावं, एका महिन्यात आमचं सरकार येणार; आदित्य ठाकरेंचा कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल

यावेळी पंकजा मुंडे यांनी 'चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की…बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ…मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ.', असे म्हणत वारशात संघर्ष आणि लढण्याची जिद्द मिळाली असल्याचे सांगितले. 'संकटात जातपात न बघता एकमेकांच्या मदतीला आलो आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. लोकांचे दुख बघून ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकत नाही.', असं देखील त्यांनी सांगितले.

Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?
Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

तसंच, 'धर्मवाद, जातीवाद हे राक्षस आज उभे ठाकले आहेत. मी देवीला प्रार्थना करते की या राक्षसांना नष्ट करा. जातीपातीचे राक्षस संपवण्याची वेळ आली आहे. आजच्या युगात रक्तबिजासारखा राक्षस पुन्हा जन्मला आहे. पण सर्वांनी एकोप्याने राहण्याची गरज आहे. मी जातपात शिकले नाही, मी भेदभाव करणं शिकले नाही. कारण भगवानबाबा आणि माझ्या बाबांनी ते मला शिकवले नाही. प्रत्येक जातीसाठी मी लढणार.', असे पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे सांगितले. तसंच, दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. खोटे काम करू नका आणि गुंडे पोसू नका.', असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?
Dasara Melava: महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे, कधी आणि कुठे कोण बोलणार? ठाकरे आणि शिंदेंकडे राज्याचे लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com