साेमवारपासून भाजपची महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा

bjp jan ashirwad yatra
bjp jan ashirwad yatra
Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ . भारती पवार , डॉ . भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्ट (साेमवार) पासून राज्याच्या वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा bjp jan ashirwad yatra काढणार आहेत.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची १६ ते २१ ऑगस्ट तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची १९ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे अशी माहिती यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी दिली.

आमदार केळकर म्हणाले कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर इतका प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील सात लोकसभा मतदार संघात ६२३ किलोमीटर प्रवास करेल तसेच नारायण राणे यांची यात्रा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरु होईल.

bjp jan ashirwad yatra
कशी प्रशासनाने थट्टा मांडली.., जिवंत शेतक-याची मृत नाेंद केली

राणेंची यात्रा वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल. या यात्रेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेणे तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे हा हेतु आहे. त्यासाठी हे चारही मंत्री सज्ज झाले आहेत.

या यात्रांचे समन्वयक म्हणून आमदार निरंजन डावखरे, आमदार सुनील राणे, आमदार अशोक उईके, माजी आमदार प्रमोद जठार, राजन नाईक हे काम पाहणार आहेत असे आमदार काेळेकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.