दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

BJP Internal Conflic: नाशिक महापालिकेत परपक्षीयांच्या पक्षप्रवेशावरून चांगलच राजकारण तापलयं... भाजपात झालेल्या जोरदार इनकमिंगमुळे निष्ठावंतांनी पक्षांतील वरिष्ठ नेत्यांविरोधात रणशिंग फुकलयं... मात्र भाजपचा हा अंतर्गत वाद कसा चव्हाट्यावर आला? निवडणुकीआधी नाशिक महापालिकेत नेमकं काय सुरुय?
BJP workers protest outside the party office in Nashik over the induction of opposition leaders ahead of civic elections.
BJP workers protest outside the party office in Nashik over the induction of opposition leaders ahead of civic elections.Saam Tv
Published On

नाशिकमध्ये भाजपनं मोठी खेळी खेळत तीन पक्षातील चार उमेदवांराना एकाचवेळी पक्षप्रवेश देण्याचा डाव टाकला. मात्र ज्यावेळी हे पक्षप्रवेश सुरू होते त्याचवेळी बाहेर मात्र पक्षातल्या निष्ठावंतानी एकच राडा केला..पक्षप्रवेशावेळी शक्तीप्रदर्शन करणाऱ्या ठाकरे सेनेचे माजी महापौर विनायक पांडेंविरोधात आमदार देवयानी फरांदे समर्थकांनी घोषणाबाजी केली...एवढंच नाही तर या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांनाही पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला... विरोधकांचा पक्षप्रवेश होत असेल, तर निष्ठावंतांनी नेमकं काय करायचं, असा सवालच पदाधिकाऱ्यांनी विचारला.

पक्षप्रवेशाआधी आमदार देवयानी फरांदेंनी पोस्ट शेअर करत... विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचं स्पष्ट केल होतं. एवढंच नव्हे तर फऱांदे आणि महाजन यांच्यात सकाळी एक बैठकही झाली होती.मात्र पक्षप्रवेशाला जाहीर विरोध करूनही पक्षप्रवेश झाल्यानं नाशिकमधील भाजपचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले..

ठाकरेसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतिन वाघ, मनसे नेते दिनकर पाटील आणि काँग्रेस नेते शाहू खैरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय..या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या देवयांनी फरांदे यांनी पक्षप्रवेशाला आपला विऱोध कायम असल्याचं सांगत महाजनांवर मात्र आपण नाराज नसल्यांच स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com