Maharashtra CM : शिंदेंसेनेचा विरोध, तरीही भाजप देवेंद्र फडणवीसांच्या फेवरमध्ये, लवकरच घोषणा होणार?

Eknath Shinde vs Devendra Fadanvis: एकनाथ शिंदे यांच्या विरोधानंतरही भाजप देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केलाय.
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Maharashtra Politics eknath shinde devendra fadnavis Saam TV
Published On

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याबाबत राजकीय चर्चेनं जोर धरलाय. महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांचं पारडे जड मानले जातेय. मित्रपक्ष अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दर्शवलाय. महायुतीमधील १७८ आमदारांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्या. अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामध्ये मुख्यंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. (Who will be Mahayuti's CM pick?)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रतिकाराकडे दुर्लक्ष करून, भाजपने देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तशी लॉबिंगही सुरु करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेनेतील काही नेत्यांनी विरोध दर्शवलाय. राष्ट्रवादी काग्रेसच्या अजित पवार गटाने फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना दिली. भाजपच्या सर्वच आमदार आणि अजित पवार यांचा पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचं समजतेय.

सूत्रांनी दिलेल्या माहुतीनुसार, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा मेसेज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपकडून कळवण्यात आलेय.त्याशिवाय शिवसेनेलाही हा निर्णय लवकरच कळवण्यात येईल. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

भाजपकडे तब्बल १३२ जागा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळाले, अशी माहिती भाजपमधील अतंर्गत सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही पाठिंबा देण्यात आलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय भाजप सरकार स्थापन करण्यात येऊ शकतो. महाराष्ट्रात सरकार स्थापन कऱण्यासाठी १४५ जागांची गरज असते. भाजपकडे सध्या १३२ जागांचे समर्थन आहे. अजित पवार यांच्या ४१ आमदारासह भाजपचं समर्थन वाढत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आलेली आहे. इतर मंत्रिपदाबाबात अद्याप चर्चा झालेली नाही. कोणत्या पक्षाला किती मंत्रि‍पदे देण्यात येणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांना निवडण्यात आलेय. भाजपकडून अद्याप गटनेतेपदी कोणत्याही नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्याची शक्यता आहे. पण विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळेच भाजपला विधानसभेला भरघोस यश मिळालेय. त्यामुळे त्यांचीच निवड होईल, असे बोलले जात आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे नेतृत्व कोण करणार? यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्रि अमित शाह चर्चा करणार आहेत. अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत,त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

बिहार मॉडेलचा दाखला देत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवावे, अशे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मागणी केली. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर भर देत मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांना मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्राचा गाडा कोण हाकणार? याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com