Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंना भाजपकडून पुन्हा 'दे धक्का', १२९ कोटींचं टेंडर रद्द

Maharashtra Government Eknath Shinde Political Conflict: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंजूर केलेलं टेंडर भाजपकडून रद्द करण्यात आलं आहे.
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet ministrySaamtv
Published On

Eknath Shinde Political Conflict: महायुती सरकारमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंजूर केलेलं टेंडर भाजपकडून रद्द करण्यात आलं आहे.

पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्काय वॉक बांधकामांचे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. १२९ कोटी रूपयांच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीचं सरकार सत्तेत आलं. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही घटक पक्षात राजकीय कुरघोडी सुरू झाल्या. नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

नुकतंच महापालिकेकडून जवळपास १४०० कोटींचं प्रकल्प रद्द करण्यात आल्यानं शिंदेंना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी जोर लावून धरला होता. मात्र, हा टेंडर रद्द केल्यानंतर आणखी एक टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Amit Shah: अमित शहांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल, पुणेकरांनो घ्या नोंद

महापालिकेकडून टेंडर रद्द केल्यानंतर, आता पंढरपुरातील दर्शन मंडपाचे १२९ कोटी रुपयांचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बांधकाम खात्यानं घेतला आहे. मागील आषाढी यात्रेच्यावेळी तत्काळीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Crime News: मामा झाला हैवान! १७ वर्षीय भाचीवर वारंवार बलात्कार, अमरावती हादरलं

मात्र, दर्शन मंडपाच्या १२९ कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. अचानक दर्शन मंडपाच्या १२९ कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com