गव्याच्या दर्शनाने दहिवडीकरांची उडाली झाेप

Bison
Bisongoogle
Published On

सातारा : दहिवडी Dhaiwadi शहरात मंगळवारी रात्री काही नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. शहरात गवा Bison आल्याची माहिती समजताच त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्या छायाचित्रणासाठी परिसरातील नागरिक जमले हाेते. परंतु अवघ्या काही मिनीटातच हा गवा त्याच्या पिल्लासह झुडपात गायब झाला.

दहिवडी शहरात रात्री पावणे नऊच्या सुमारास काही नागरिकांना गव्याचे व त्याच्या पिलांचे दर्शन झाले. दुष्काळी भागात पहिल्यांदाचा गवा आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. हा गवा आपल्या पिलासह एकता नगरमधून विकासनगर झोपडपट्टी मार्गे महात्मा गांधी विद्यालय, पाटील हॉस्पिटल या परिसरात फिरत हाेता. यामुळे काही काळ नागरिकांचा गोंधळ उडाला.

Bison
विजयाेत्सव! तीस हजार पाहुण्यांची मेजवानीसह विशेष व्यवस्था

काही वेळातच अंधाराचा फायदा घेऊन गवा व त्याचे पिल्लू सामाजिक वनीकरण विभागाच्या झाडीत पसार झाले. रात्रीच्या सुमारास अचानक गवा शहरी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com