भूतान-श्रीलंकेतून महाराष्ट्रात आलेल्या तिबोटी खंड्याचा जीव वाचवण्यात यश

Wildlife : कोकण किनारपट्टीवरील दुर्मिळ तिबोटी खंड्याचा जीव पक्षीप्रेमींनी वाचवला. रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी असलेल्या या सुंदर खंड्याला प्रथमोपचार करून पुन्हा निसर्गात सोडण्यात आले.
rare kingfisher bird
Oriental Dwarf Kingfishergoogle
Published On

कोकण किनारपट्टीवर पावसाच्या आगमनासोबतच दिसणारा आणि पक्षीप्रेमींचा लाडका ठरलेला दुर्मिळ तिबोटी खंड्या याचा जीव नुकताच वाचवण्यात आला आहे. ‘ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर’ म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी प्रत्येक वर्षी भूतान, श्रीलंका आदी ठिकाणांहून महाराष्ट्रात येतो आणि ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला लागतो. या मोसमात त्याची प्रणयलीला, मादीसाठी केलेले आकर्षक नृत्य व खाद्य भेटी हे देखावे पक्षी निरीक्षकांसाठी नेहमीच खास ठरतात.

नर–मादी मिळून जमिनीत बीळ खोदून घरटे तयार करतात. ओढ्याच्या काठावर फांदीवरून झेप घेत खोदकाम करताना हा पक्षी पाहण्याजोगा दिसतो. बेडूक, खेकडे, कोळी, सरडे हे त्याचे आवडते खाद्य असून एका मोसमात तीन-चार अंडी घालून पिल्लांना जवळपास वीस दिवस सांभाळले जाते. रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हापक्षी’ म्हणून २०२० मध्ये तिबोटी खंड्याची निवड करण्यात आली होती.

rare kingfisher bird
Brain Stroke Symptoms: थकवा समजून दुर्लक्ष करू नका, ही असू शकतात ब्रेन स्ट्रोकची लक्षणे; तज्ज्ञांकडून धक्कादायक माहिती

या दुर्मिळ पक्ष्यावर शहरातील कावळ्यांनी हल्ला केल्याचा अंदाज पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत. पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले की, कावळ्यांच्या हल्ल्यामुळे तिबोटी खंड्याला इजा झाली असावी. मात्र, संस्थेचे ऋषिकेश सुरसे आणि ओंकार साळुंखे यांनी तत्काळ प्रथमोपचार करून त्याला पुन्हा निसर्गात मुक्त केल्याने त्याचा जीव वाचला.

चक्रीवादळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे या पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असला तरी पक्षीप्रेमी आणि संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांमुळे तिबोटी खंड्या पुन्हा आपल्या नैसर्गिक आवासात परतला आहे. हा क्षण पक्षीप्रेमींसाठी एक दिलासा देणारा ठरला आहे.

rare kingfisher bird
Aarpaar Movie Review: आरपार हिट की फ्लॉप? वाचा संपूर्ण रिव्ह्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com