Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

NCP Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला आणखी एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली. विनोद देशमुख यांना जळगाव शहर पोलिसांनी अटक केली. व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
ajit pawarx
Published On

Summary -

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक

  • विनोद देशमुख यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

  • व्यवसायिक मनोज वाणी यांना जीवे मारण्याची दिली होती धमकी

  • विनोद देशमुख हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. अजित पवार गटाचे अर्बन सेलचे राज्यसंघटक विनोद देशमुख यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी अटक केली. व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रादीच्या नेत्याच्या अटकेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायिक मनोज वाणी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विनोद देशमुख यांना शहर पोलिसांनी अटक केली. मनोज वाणी यांच्या रामदास कॉलनीतील कार्यालयावर हल्ला करून दरोडा तसेच जीव मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याआधीच करावाई करण्यात आली होती. रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी त्यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली होती.

Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

जळगाव शहर पोलिस ठाण्यात देखील विनोद देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणी त्यांना शहर पोलिसांनी देखील अटक केली आहे. मनोज वाणी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात तब्बल ३ वर्षांनंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यामुळे पोलिस विनोद देशमुखांना अटक करत नाही असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता देमुखांना पोलिसांनी अटक केली.

Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
NCP clash Pune : पुण्यात राष्ट्रवादीत राडा, शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com