Sharad Pawar Party Name: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार', पवारांच्या पक्षाला मिळालं नवीन नाव

Sharad Pawar News: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव मिळालं आहे. '
Sharad Pawar Party Name
Sharad Pawar Party NameSaam Digital
Published On

Sharad Pawar Party Name:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव मिळालं आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार', असं आता शरद पवार गटाचे नाव असणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून पक्षाच्या नवीन नावासाठी तीन पर्याय सांगण्यात आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदराव पवार आणि एनसीपी - शरद पवार, या तीन नावांचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Party Name
UCC Bill : उत्तराखंडचं ऐतिहासिक पाऊल! समान नागरी संहिता विधेयक धामी सरकारने केला मंजूर

यात निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार', हे नाव स्वीकारले आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी 6 जागांच्या निवडणुकीच्या उद्देशाने आणि निवडणूक आचार नियम, 1961 चा नियम 39AA नुसार एक वेळचा पर्याय म्हणून या गटाचे नाव म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, शरद पवार गटाने त्यांच्या पक्षाची तीन नावे आणि चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. यातच कपबशी, चष्मा, सूर्यफूल आणि उगवता सूर्य यापैकी एक निवडणूक चिन्ह शरद पवार गटाकडून निवडला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar Party Name
Pune Tahsildar Suspended: पुण्यातील सासवड EVM चोरी प्रकरणी तहसीलदार सस्पेंड, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

आयोगाच्या निर्णयामुळे अजित गटात आनंदाची लाट

शरद गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप व्यक्त केला असताना, अजित पवार गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांसह भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेशी युती केली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com