LPG Gas Cylinders
LPG Gas Cylinders Saam TV

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता महिन्याला मिळणार फक्त दोनच सिलेंडर

नव्या प्रक्रियेनुसार ग्राहकांना आता एका वर्षात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहे. या सिलेंडरचा कोटा संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त सिलेंडर मिळणार नाही.
Published on

LPG Gas Cylinders News : आधीच महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas) धारकांना आता रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. या प्रक्रियेनुसार ग्राहकांना आता एका वर्षात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहे. या सिलेंडरचा (Gas Cylinder) कोटा संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त सिलेंडर मिळणार नाही.

LPG Gas Cylinders
Nashik : बेरोजगार जावयाची करामत; सासूच्याच घरात केली चोरी

इतकंच नाही तर एलपीजी सिलेंडरचा प्रत्येक महिन्यांचा कोटा सुद्धा निश्चित करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, एलपीजी ग्राहकांना आता एका महिन्यात एकच सिलेंडर घेता येणार आहे. म्हणजेच काय तर एक सिलेंडर घेतल्यानंतर त्याच महिन्यात दुसरे सिलेंडर मिळणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शनधारक हवे तितके सिलिंडर घेऊ शकत होते.

वितरकांनी दिलेल्या माहितनुसार, सिलेंडरसंदर्भात रेशनिंगसाठी असणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांची तातडीने अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा महाग आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रिफीलचा वापर कऱण्यात येतो. याच्या तक्रारी समोर आल्यानं घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला गेला.

LPG Gas Cylinders
Beed Crime News : मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं!

दरम्यान, हा नवा नियम तिनही तेल कंपन्यांकडून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता अनुदानित सिलेंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात फक्त 12 गॅस सिलेंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलिंडरची आवश्यकता असेल तर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत.

रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकतो. तसंच कोणत्याही परिस्थितीत वर्षभरात 15 पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत. एखाद्या ग्राहकाला जास्त गॅस लागत असल्यास त्याचा पुरावा देऊन तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच अतिरिक्त रिफिल मिळेल.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com