तबरेज शेख, साम टिव्ही
Nashik Crime News : जावई माझा भला असा जुना मराठी चित्रपट आहे. मात्र, नाशिकमधील (Nashik) एका सासूवर जावई माझा चोर म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, एका बेरोजगार जावयाने लेडीज पार्लर चालविणाऱ्या सासूच्या घरात चोरी केली आहे. जावयाने सासूच्या घराची चावी चोरली (Crime) आणि साडेदहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले. नाशिकमधील गंगापूर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सासूच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. (Nashik News Today)
आलोक दत्तात्रेय सानप (२३ रा. तिरुमाला, गुलमोहर अपार्टमेन्ट, मखमलाबाद रोड, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयित जावयाचे नाव आहे. गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये एका बंद घराची चावी चोरून चोरट्यांनी घरातून १० लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली होती.
याबाबत मीरा शशिकांत गंभीरे (50, रा. श्री बालाजी पॅराडाईज, मोतीवाला कॉलेजजवळ) यांनी फिर्याद दिली होती. गंगापूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत सर्वच सीसीटीव्ही तपासले. त्यात त्यांना मीरा गंभीरे यांच्या जावयासारखी देहयष्टी असलेला संशयित दिसून आला. त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली दिली. (Nashik News In Marathi)
आरोपी जावयाकडून गुन्हा घडल्याच्या २४ तासांत ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे २४९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. लेडीज पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या मीरा गंभीरे यांच्या मुलीने आलोक सानप याच्याशी प्रेमविवाह केला आहे. आलोखने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले असून सध्या तो बेरोजगार आहे.
आरोपी आलोख याचे सासुरवाडीला येणे-जाणे असल्याने त्याला घरातील वातावरणाची बरीचशी माहिती झाली होती. त्यामुळे त्याने घराच्या लॉकच्या दोनपैकी एक चावी चोरली होती. सासू बाहेर गेल्याचं बघताच त्याने संधी साधत चोरी केली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.