Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Rajkumar Patel joins Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विदर्भात बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने आपल्या मुलासह काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. अमरावतीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • विदर्भात बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.

  • राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

  • राजकुमार पटेल यांनी विविध पक्षांतून पाचव्यांदा पक्ष बदलला आहे.

  • आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली.

अमर घटारे, अमरावती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर वाढले आहे. अशातच विदर्भामध्ये बच्चू कडू यांन मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने बच्चू कडू यांची साथ सोडली आहे. या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली आहे.

प्रहारचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. राजकुमार पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी साथ सोडल्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

राजकुमार पटेल यांनी विविध पक्षातून पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. आधी बसपा, भाजपा, राष्ट्रवादी त्यानंतर प्रहार संघटनेमध्ये असललेल्या राजकुमार पटेल यांनी आता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. राजकुमार पटेल यांनी अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: ...यार ने ही लूट लिया घर यार का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना असं का म्हणाले?

राजकुमार पटेल यांच्या काँग्रेसच्या पक्षप्रवेशाने मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पक्षांतर करणारे राजकुमार पटेल हे पहिले व्यक्ती आहेत. २०२४ च्या निवडणुकीत राजकुमार पटेल यांनी प्रहारकडून निवडणूक लढवली होती. राजकुमार पटेल यांचा भाजपचे केवलराम काळे यांच्याकडून पराभव झाला होता. आतापर्यंत राजकुमार पटेल यांनी सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ३ वेळा मेळघाटमधून ते आमदार झाले आहेत तर ४ वेळा त्यांचा पराभव झाला आहे.

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: मंगल प्रभात लोढांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दादर कबुतरखान्याबाबत चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com