रायगड : मसुळधार पावसाने Heavy rain सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. यातच रायगड Raigad जिल्ह्यामध्ये देखील मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यामधील महाड Mahad तालुक्यात दरड कोसळली आहे. यामध्ये ३० घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत.
हे देखील पहा-
तसेच यामध्ये एकूण ७० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाड येथील बिरवाडी Birwadi मध्ये ३० घरे ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. या परिसरात अनेक नागरिक बेपत्ता झाल्याची शंका पोलिस Police आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. कोकणा Konkanमधील विविध ठिकाणी पावसाचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे.
काही ठिकाणी पूल brig देखील कोसळले आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये लोक वाहून गेल्याची देखील घटना घडली आहे. यातच आता महाडमध्ये देखील तब्बल ३० घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली असल्याची शक्यतेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाडमध्ये या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाकडून मदत कार्याकरिता हालचाली सुरू करण्यात आले आहेत. मात्र, पुराच्या पाण्याने घटनास्थळी मदत पोहोचवण्यास विलंब होण्याची भीती वाटत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.