Chhath Puja : रेल्वेचं डोकं ठिकाणावर आहे का? छटपूजेसाठी रेल्वे स्टेशन्सवर भोजपुरी गाणी

Chhath Puja Railway News : मुंबई आणि नवी मुंबईतील CSMT, वडाळा, सानपाडा रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या तक्रारी, ठाकरेसेना आणि मनसेची टीका तसेच रेल्वे प्रशासनाची भूमिका जाणून घ्या.
Mumbai Railway Station News
Mumbai Railway Station News AI image
Published On: 

सुप्रीम मस्कर, मुंबई

मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर भोजपुरी गाणी तुम्ही ऐकली असतीलच.मात्र याचं भोजपुरी गाण्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालयं. मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाण्यांचा धिंगाणा कशासाठी? नेमकं प्रकरण काय?

भोजपुरी गाण्यांचा हा ठेका बिहारमधल्या रेल्वे स्थानकातील नव्हे तर मुंबई आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानकातला आहे. मोठ मोठ्या आवाज भोजपुरी गाणी वाजवण्याचा हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा आणि सानपाडासह अनेक स्थानकांवर पाहायला मिळतोय. त्यामुळे रेल्वेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Mumbai Railway Station News
Hair Fall : विशीतच केस पांढरे होताहेत? आजच करा 'हे' उपाय; महिनाभरात दिसेल चमत्कार

याच भोजपुरी गाण्यांमुळे गाड्यांंची आणि त्यांच्या वेळेची अनाऊंसमेंटही नीट होत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. त्यामुळे भोजपुरी गाणी वाजवण्याच्या या मस्तवालपणाविरोधात ठाकरेसेनेच्या नगरसेविकेनं थेट स्टेशन मास्तरालाच जाब विचारला. तर मनसेनं यूपीतल्या निवडणुकीसाठी हा प्रकार सुरु असल्याची टीका केलीय.यामुळे मात्र रेल्वे स्थानकातील भोजपुरी गाण्यांवरून राजकारण चांगलंय तापलंय.

महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करू नका, असा इशारा ठाकरेसेनेच्या राऊतांनी दिलाय, तर काँग्रेस आणि भाजपनं भोजपुरी गाण्याचं समर्थन केलयं. दुसरीकडे छठपूजेनिमित्त देशभरातील सर्व स्टेशन्सवर गाणी वाजवली जात असल्याचा अजब दावा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलाय. मुळात रेल्वे स्टेशनवरील उद्घोषणा फक्त प्रवाशांना लोकलच्या अचुक वेळीची माहिती देण्यासाठी आणि प्रवाशांची सोयीसाठी असते. मात्र स्टेशनवर छटपुजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवून रेल्वे प्रशासन नेमकं कुणाला खुश करतयं? रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी वाजवण्याची मागणी कुणीही केलेली नसताना हा धागडधिंगा कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? हा भोजपुरी ठेका मराठी संस्कृतीवर मीठ चोळण्यासाठीच ऐकवला जात असून उगाच वादाला निमंत्रण देण्याचा हा खोडसाळपणा करणाऱ्या रेल्वेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल स्वप्नील नीला यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.