Bhiwandi Fire News : भिवंडीत कपड्याच्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Bhiwandi News : कंपनीत कच्च्या कपड्यांवर रंग प्रक्रिया करण्याचं काम होतं. कंपनीत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग आणखीच भडकली.
Bhiwandi Fire News
Bhiwandi Fire NewsSaam TV
Published On: 

फय्याज शेख

Bhiwandi News : भिवंडी शहरातील अग्नितांडवांच्या घटना सुरूच आहेत. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास धामणकर नाका अजंठा कंपाउंड या परिसरातील महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत कच्च्या कपड्यांवर रंग प्रक्रिया करण्याचं काम होतं. कंपनीत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग आणखीच भडकली.

अजंठा कंपाऊंड या नागरी वस्तीमध्ये ही महाकाल डाईंग आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी दाखल झालेला अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. आगीत कंपनीमधील यंत्रसामुग्री, कच्चा कपडा, रंग प्रकियेचे रसायन हे जळून खाक झाले आहे. (Latest Marathi News)

Bhiwandi Fire News
Uddhav Thackeray-BJP News : कुठल्याही अटी-शर्तींशिवाय उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजपसोबत यायचंय? भाजप आमदाराचा सर्वात मोठा दावा

आगीच्या धुराचे लोट दुरुनही दिसत होते. घटनास्थळी महानगरपालिकेच्या ३ अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारणही अजून स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com