Bharati Pawar Passed away : भारती पवार अनंतात विलीन

Bharati Prataprao Pawar Demise: सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Bharati Pawar passed away
Bharati Pawar Saam tv
Published On

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारती पवार यांचं निधन सोमवारी सायंकाळी झालं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रतापराव पवार, शरद पवार, अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आदी उपस्थित होते.

भारती प्रतापराव पवार यांच्या पश्चात पती सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुलगा सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, कन्या अश्विनी, सून मृणाल अभिजित पवार, नातवंडे जान्हवी, राहुल आणि झाकिर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या निधनानं सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Bharati Pawar passed away
Mumbai Local Train: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! तब्बल २३८ नव्या लोकल मिळणार; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

भारती पवार यांचं माहेरचं नाव भारती श्रीपतराव पाटील असं होतं. मुंंबईतील शिवाजी पार्क परिसरात त्यांचं बालपण गेलं. बालमोहन विद्या मंदिरात शालेय शिक्षण झालं. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली होती. चित्रकलेची त्यांना आवड होती. त्यांनी याच विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा विवाह प्रतापराव पवार यांच्याशी झाला.

भारती पवार यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती. पुण्यात आल्यानंतर त्यांनी सकाळ माध्यमातील अनेक उपक्रमांत सहभागी घेतला. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत.

Bharati Pawar passed away
Nagpur News: २०-३० लोक स्कार्फ बांधून आले, धारदार शस्त्र अन् बाटल्यानं परिसर जाळलं; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचालित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.

भारती पवार यांनी बालकल्याण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतला. चित्रकलेच्या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

पवार कुटुंबाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आदींनीही भारती पवार यांना ‘एक्स’वरून श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com