Bharat Jodo Yatra: देशातील पैसा दोन-तीन लोकांना दिला जातोय, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

मोदी सरकारने देशात नोटबंदी केली, चुकीची जीएसटी कर प्रणाली लागू केली.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam TV
Published On

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो नांदेडमध्ये आहे. आजच्या सभेत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरात गेल्याच्या मुद्द्यावरुनही त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.

राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे तपस्वी होते. या सर्वांनी तपस्या केली. या देशातील प्रत्येक मजूर, छोटा व्यापारी तपस्वी आहे. तर मोदी एक वेगळेच तपस्वी आहे. त्यांची तपस्या अश्रूंची आहे. सध्या फक्त दोन तीन लोकांचं भलं करण्यात येत आहे.  (Maharashtra News)

Rahul Gandhi
'जगदंब' तलवार पुन्हा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मोदी सरकारने देशात नोटबंदी केली, चुकीची जीएसटी कर प्रणाली लागू केली. पाच वेगवेगळे कर लागू करण्यात आले. शेतीच्या वस्तूंवर कर लावण्यात आला. लोकांवर विविध कर लादले जात आहेत.

तुम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिवसभर 7-8 तास दररोज चालतो. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

Rahul Gandhi
Sanjay Raut : राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, माझी अटक…

राहुल गांधी यांनी आरएसएस आणि काँग्रेसच्या लोकांमधील फरक सांगितला. राहुल यांनी केदारनाथ दर्शनातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मला केदारनाथ येथे एक आरएसएसचे नेते भेटले होते. त्यांचं वजन साधारण 100 किलो असेल. दर्शन झाल्यावर त्यांना विचारलं काय मागितलं. तेव्हा ते म्हणाले की, मी चांगली प्रकृती मागितली. वास्तविक ते हेलिकॉप्टर ऐवजी चालत आले असते तर प्रकृती चांगली झाली असती. पण मी काही मागितलं नाही, मला रस्ता दाखवल्याबद्दल महादेवाचे आभार मानले. हा फरक आहे, सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा. हा फरक आहे काँग्रेस आणि आरएसएसमध्ये. आम्ही बोलत नाही, करतो, असंही राहुल यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com