Accident : लग्नावरून परत येताना भीषण अपघात, कारने दुचाकीला उडवले, नवरा-बायकोसह चिमुकलीचा मृत्यू

Bhandra Accident After Wedding: मध्यप्रदेशातून लग्न आटोपून परतत असताना दुचाकीला भरधाव कारची धडक; नवरा-बायको आणि ५ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू, चिखला गावात शोककळा.
Bhandra Accident
Bhandra AccidentSaam TV News
Published On

शुभमन देशमुख, भंडारा प्रतिनिधी

Bhandra Latest News : मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून विवाह समारंभ आटोपून एका दुचाकीवरून गावाकडं परतत असताना भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती - पत्नीसह त्यांच्यासोबत असलेली शेजाऱ्यांची पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली. हे तिघेही दुचाकीनं चिखला मॉईल इथं जात होते, त्यावेळी काळाने घाला घातला. कैलास मरकाम (४२), पार्वता मरकाम (३६),यामिनी कंगाली (०५) यांचा मृतकात समावेश आहे. या प्रकरणाचा गोबरवाही पोलीस अधिक तपास करीत आहे.

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी बोनकट्टा राज्य मार्गावर पाथरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात कारने दुचाकी चालकाला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नवरा-बायको आणि चिमुकलीचा समावेश आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Bhandra Accident
Uddhav Thackeray : राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेही परदेश दौऱ्यावर, युतीची चर्चा देशाबाहेर होणार?

ही अपघाताची घटना दिनांक सोमवारी मध्यरात्री घडली. तीन जण मोटरसायकल सीडी डीलक्स एम एच 40 टी 94 20 ने बोनकट्ट्यावरून लग्नाचा कार्यक्रम आटपून नाकाडोंगरी मार्गाने चिखला या गावाला जात असताना घडली आहे. मृतकामध्ये कैलाश कामु मरकाम वय 45 वर्ष,रा.चिखला, पार्वता कैलास मरकाम वय 40 वर्ष रा चिखला कु. रूपाली दुर्गाप्रसाद कंगाली वय 5 वर्ष रा चिखला यांचा समावेश आहे. तर सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली वय 30 वर्ष रा. चिखला या ही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bhandra Accident
Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत

अपघातानंतर कारचालक घटनास्थळी वरून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मंगेश पेंदाम, तपास अधिकारी पो उपनिरीक्षक निवृत्ती गीते या प्रकरणाचा तपास करत आहेत. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिखला गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Bhandra Accident
Eknath Shinde : अनाथांचा नाथ एकनाथ! ताफा थांबवून अपघातग्रस्तांना केली मदत | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com