शुभम देशमुख
भंडारा : भंडारा जिल्ह्याला धान खरेदीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात २०२१ पासून ४१ कोटी ४९ लाख रूपयांचा महा घोटाळा झाला आहे. (Bhandara) धान खरेदी संस्थांनी शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले, पण भरडाईकरीता राईस मिल धारकांना धान दीलाच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील १२ संस्थांमधील एकूण १३४ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Maharashtra News)
भंडारा जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून संबोधला जातो. जिल्ह्यात ८० टक्के नागरीक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहेत. या संस्थेच्या माध्यमातुन (Scam) पणन विभाग त्या त्या भागात आधारभूत धान खरेदी केंद्र देतात. धान खरेदी झाल्यावर राईस मिल धारकांना खरेदी केलेला धान भरडाई करीता द्यावा लागतो. पण जेव्हा राईस मील यांना धान उचल करायची होती. तेव्हा धान खरेदी केंद्रांनी धान दिला नाही. शेतकऱ्यांच्या (Farmer) फायद्यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलं असुन या धान खरेदी केंद्र चालकांनी शासनाला कोट्यवधीचा चुना लावला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गुन्हे दाखल करत मालमत्तेवर चढविला बोजा
२०२१-२२ मध्ये असा एकूण ८ संस्थेचा सहभाग होता. तर २०२२ -२३ मध्ये ४ संस्थेने अपहार केला. शेतकऱ्यांकडून या संस्थांनी धान खरेदी केला. त्याचे पैसे देखील शासनाने दिले. पण या केंद्र चालकांनी धानाची परस्पर विक्री केली. आतापर्यन्त एकूण १२ संस्थांनी धान घोटाळा केला आहे. यात ४१ कोटी ४९ लाख रूपये शासनाचे बुडाले आहे. या विषयी वारंवार पैशांची मागणी करुण देखील केन्द्र चालकांनी तो पैसा शासनाला जमा केला नाही. आता या संस्था विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे १२ संस्थामधील १३४ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.