Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; तलावावर मासेमारीसाठी गेला असतानाची घटना

Bhandara News : सकाळपासून गेले असताना सायंकाळ होऊन देखील घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला
Tiger Attack
Tiger AttackSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : तलावावर मासेमारी करत असताना याच ठिकाणी पाण्याच्या शोधात आलेल्या वाघाने मासेमारी करणाऱ्या इसमावर हल्ला करत जंगलात ओढत नेने. यात सदर इसमाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पिटेसूर परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील पिटेसुर येथील रहिवासी लक्ष्मण मोहणकर (वय ५०) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या स्वर्ण तलाव परिसरात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र सकाळपासून गेले असताना सायंकाळ होऊन देखील घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र आढळून न आल्याने याबाबत पोलिस व वन विभागाला माहिती देण्यात आली. 

Tiger Attack
Leopard Attack : घरासमोर खेळणाऱ्या बालकावर बिबट्याचा हल्ला; नागरिकांनी धाव घेतल्याने सुदैवाने वाचले प्राण

जंगलात सापडला मृतदेह 

यानंतर पोलिस व फॉरेस्ट विभागाच्या पथकाने माहिती मिळताच शोध घेण्यास सुरवात केली. यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता त्याचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला. दरम्यान त्याच्या पाय देखील शरीरापासून वेगळा पडला होता. त्यावरून वाघाने त्याची शिकार केल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Tiger Attack
Shrirampur News : अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनून दूध केंद्रांवर धाड; दोन तोतया अधिकारी जेरबंद

सतर्क राहण्याचा आवाहन 

दरम्यान या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने वन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळच्या वेळी घराच्या बाहेर न पडण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. तर वाघाला पकडण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com