Maharashtra Politics: अजित पवार 20-25 वर्षांनी मुख्यमंत्री बनतील; भाजपच्या बड्या नेत्याचा मिश्किल टोला

Atul Save on Ajit Pawar Upcome CM: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे
bhandara news Minister Atul Save reaction on ajit pawar Upcoming cm in maharashtra
bhandara news Minister Atul Save reaction on ajit pawar Upcoming cm in maharashtrasaam tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही

Atul Save on Ajit Pawar

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचं वातावरण असून शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय. अशातच अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर भाजपच्या बड्या नेत्याने मिश्किल टोला हाणला आहे. (Latest Marathi News)

bhandara news Minister Atul Save reaction on ajit pawar Upcoming cm in maharashtra
Rain in Maharashtra: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात, पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये कोसळणार; IMD अंदाज

अजितदादा अजून 20-25 वर्षांनी मुख्यमंत्री होतील, अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. एकनाथ शिंदेचं राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याची आठवण देखील अतुल सावे यांनी करुन दिली आहे.

भाजप काँग्रेसमुक्त राज्य करण्याचं स्वप्न बघत असून अजित पवार (Ajit Pawar) यांना भविष्यात मुख्यमंत्री बनविणार असल्यास भाजपचं स्वागत करतो, अशी कोपरखळी सुप्रिया सुळे यांनी मारली होती. त्यावर बोलताना अतुल सावे यांनी ही मिश्किल टिप्पणी केली आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले अतुल सावे?

मंत्री अतुल सावे शुक्रवारी भंडारा दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याबाबत क्लिअर केलं नाही. त्यांना मुख्यमंत्री कधी करतील हे काही लिहिलं नाही. भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. भविष्य कधीही असू शकते, 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षानी, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचंच ठरलं, तर आम्ही त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असं जाहीर विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर बोलताना अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार घालण्याची संधी मला द्या, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली होती.

bhandara news Minister Atul Save reaction on ajit pawar Upcoming cm in maharashtra
Lok Sabha 2024 Survey: आज लोकसभा निवडणूक झाली तर, भाजपला कोणत्या राज्यात बसू शकतो फटका? दिल्ली-पंजाबमध्ये 'आप'ची स्थिती काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com