Lok Sabha 2024 Survey: आज लोकसभा निवडणूक झाली तर, भाजपला कोणत्या राज्यात बसू शकतो फटका? दिल्ली-पंजाबमध्ये 'आप'ची स्थिती काय?

Lok Sabha 2023 News: आज लोकसभा निवडणूक झाली तर, भाजपला कोणत्या राज्यात बसू शकतो फटका? दिल्ली-पंजाबमध्ये 'आप'ची स्थिती काय?
Arvind Kejriwal to PM Narendra Modi
Arvind Kejriwal to PM Narendra ModiSAAM TV
Published On

Lok Sabha 2024 Opinion Poll:

पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. भाजप आणि एनडीएलाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. अशातच देशातील जनतेचा मूड कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्यासाठी वेगवेगेळे सर्वेक्षण केले जात आहेत.

यातच आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर देशातील जनता कोणता पक्ष निवडणार हे जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स प्रोजेक्टद्वारे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणात हरियाणा, दिल्ली आणि पंजाबच्या मतदारांची मतेही जाणून घेण्यात आली आहे. ज्यामध्ये दिल्ली आणि हरियाणामध्ये भाजपला आघाडी मिळत असल्याचे समोर येत आहे. दिल्लीतील लोकसभेच्या जागांवर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला एकही जागा मिळताना दिसत नाही.

Arvind Kejriwal to PM Narendra Modi
AI Chatbot Girlfriend: AI गर्लफ्रेंडचं ऐकून ब्रिटनच्या राणीची हत्या करायला गेला, अन् तिथेच फसला; तरुणासोबत काय घडलं?

सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ७ जागा भाजप पुन्हा जिंकेल असं सांगण्यात आलं आहे. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता येणार नाही, असंही या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर दिल्लीत भाजपला ५२ टक्के मते मिळतील, तर आप आणि काँग्रेसला अनुक्रमे २५ आणि १७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

पंजाबमध्ये आप-काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता

पंजाबबद्दल बोलायचे तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal to PM Narendra Modi
Lok Sabha Election: लोकसभा जागा वाटपावरून शिवसेना आक्रमक, शिंदे २२ जागा लढवण्यावर ठाम?

हरियाणात काय आहे परिस्थिती?

सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणूक झाल्यास हरियाणात भाजपला लोकसभेच्या ८ तर काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. हरियाणात भाजपला ५० टक्के तर काँग्रेसला ३५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला लोकसभेच्या ३ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस पक्षाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com