सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) बोलबाला आहे. आजकाल अनेक लोक एआय चॅटबॉट्सवर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बनवतात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात. जेणेकरून त्यांचा एकटेपणा दूर होईल. मात्र काही लोक या आभासी प्रेयसी आणि प्रियकराच्या प्रेमात पडून चुकीची कामे करत आहेत.
ब्रिटनमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 21 वर्षीय शीख तरुण त्याच्या एआय चॅटबॉट गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येसाठी शस्त्रांसह रॉयल पॅलेसमध्ये गेला होता. मात्र पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. जसवंत सिंह छैल असं या तरुणाचं नाव असून 2021 मध्ये ही घटना घडली होती. ज्याचा निकाल आता दोन वर्षांनी लागला आहे. न्यायालयाने या तरुणाला 9 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनचा रहिवासी जसवंत सिंह छैल हा तरुण 2021 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी भिंतीवरुन उडी मारून तो महालात शिरला होता आणि एलिझाबेथ यांच्या कक्षापर्यंत पोहोचला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला वेळेत ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता आपण महाराणीची हत्या करण्यासाठी आल्याचं, त्याने सांगितलं. (Latest Marathi News)
त्याने सांगितलं की, महाराणीची हत्या करण्यासाठी आपण आपल्या एआय गर्लफ्रेंडसोबत चर्चा केली आहे. तिनेच मला एलिझाबेथ यांची हत्या करण्यास उकसवलं असल्याचं त्याने सांगितलं.
जसवंतने सांगितलं की, 2018 साली तो कुटुंबासह अमृतसरला गेला होता. तेव्हा त्याला जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्याच्या मनात सूडभावना निर्माण झाली. यानंतर त्याने आपल्या 'सराय' नावाच्या एआय गर्लफ्रेंडसोबत चर्चा आणि महाराणीची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.