रक्षाबंधनाची शासकीय सुटी रद्द; पुरपरिस्थितीमुळे काढले आदेश

रक्षाबंधनाची शासकीय सुटी रद्द; पुरपरिस्थितीमुळे काढले आदेश
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

भंडारा : जिल्‍ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पुरजन्‍य परिस्थिती आहे. ही संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता उद्याची (११ ऑगस्‍ट) रक्षाबंधनची (Raksha Bandhan) शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याना आपल्या आस्थापनात हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. (Bhandara News Rain Flood)

Bhandara News
Jalgaon: शिंदे गटात पहिल्या फळीत सहभागी तरी मंत्रिपदासाठी उपेक्षाच

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात संभाव्य पुर परिस्थिति लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सदरचे आदेश काढले आहेत. गुरुवारी (11 ऑगस्ट) रक्षाबंधन आहे. यानिमित्‍ताने शासकिय सुटी असते. परंतु, जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पुरजन्‍य परिस्थिती आहे. यामुळेच शासकीय सुट्टी रद्द करण्याचे आदेश निर्गमित केले असून सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याना आपल्या आस्थापनात/ मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तर कारवाईचा इशारा

दुसरीकडे उद्या (11 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा (शासकीय -खाजगी) सर्व शिकवणी वर्ग, अंगनवाडी केंद्र यांना सुटी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे उपरोक्त कालावधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या मुख्यालयी रहाणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उल्‍लंघन केल्यास आपत्‍ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com