Bhandara News : आंघोळीला नदीकाठी गेला अन् परतलाच नाही; दहावीच्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Bhandara News
Bhandara NewsSaam Tv
Published On: 

Latest Bhandara News : मित्रासोबत वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दहावीतील एका विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे घडली आहे. श्रेयस जिभकाटे (16) रा. वलनी ता. पवनी असे मृताचे नाव आहे. या मन सून्न करण्याऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Bhandara News
Ulhasnagar Crime : मोठ्या भावाला पत्नीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; लहान भावाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस गावातील गांधी विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होता. परीक्षेच्या तयारीसाठी सुट्या असल्याने तो शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) घरी अभ्यास करीत होता. तर आई-वडील शेतावर कामासाठी गेलेले होते. शुक्रवा दुपारीच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसह वैनगंगा नदीवर (River) आंघोळीसाठी गेला होते.

सुरुवातीला श्रेयस आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन्ही मित्र मदतीला धावले. पण त्यांना श्रेयसला बाहेर काढण्यात यश आले नाही. आरडाओरड करून त्यांनी ११८ क्रमांकावर फोन केला व पोलीस (Police) कक्षात कळवले.

Bhandara News
Nanded-Pune Highway : आता नांदेड ते पुणे अवघ्या साडेतीन तासांत गाठता येणार; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्याच्या मदतीने श्रेयसचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान श्रेयस हा हुशार विद्यार्थी असल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com