राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंनी पोलीस स्टेशनमध्ये घातला धिंगाणा!

आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लक्ष रुपयांची रोकड चारचाकी वाहनातून तुमसर कडे घेऊन जात असताना हा प्रकार घडला.
राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंनी पोलीस स्टेशनमध्ये घातला धिंगाणा!
राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंनी पोलीस स्टेशनमध्ये घातला धिंगाणा!अभिजित घोरमारे
Published On

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत धिगांना घातला असून आमदारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

हे देखील पहा :

आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लक्ष रुपयांची रोकड चारचाकी वाहनातून तुमसर कडे घेऊन जात असताना मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टँग रूम च्या बंदोबस्ता करता तैनात असलेल्या पोलिसांनी रस्त्यावरील एका वळणात चालकाने इंडिकेटर का दिले नाही? म्हणून दुचाकी वाहनाने गाडीचा पाठलाग करीत वाहनास अडविले.

गाडीत असलेल्या यासीम छावारे आणि अविनाश पटले या आमदारांच्या दोन मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. आपणांस मारहाण करून जवळील 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी गहाळ केल्याची तक्रार फिर्यादी यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंनी पोलीस स्टेशनमध्ये घातला धिंगाणा!
Pune : सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट !

तर, बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिश उप निरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी खाकी वर्दी घालून दबंग गिरी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी आता स्वतः गृह मंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंनी पोलीस स्टेशनमध्ये घातला धिंगाणा!
नालासोपाऱ्यात कोट्यवधींचा गंडा घालणारी बंटी-बबलीची जोडी जेरबंद!

राष्ट्रवादी काँग्रेस च्या आमदाराचा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी करीत असल्याचा व्हिडियो सध्या जिल्हात वायरल झाला असून सर्व स्तरातून आमदारांवर टीका केली जात आहे. तर, दुसरीकडे फिर्यादींना केलेली अमानुष मारहाण पाहता खाकी वर्दीतील गुंड प्रवृत्ती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर काय हे पाहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com