Bhandara Crime : चोरीच्या संशयातून ग्रामस्थांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू; हत्येप्रकरणी १४ जणांना पोलीस कस्टडी

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील जयश मैंद यांच्या ट्रॅक्टर दुरुस्तीच्या दुकानाच्या मागील भागातून लोखंडी सळाखीचे तुकडे चोरी करून भरत असतांना जयश मैंद यांनी चंद्रशेखर कायते याला पहिले
Bhandara Crime
Bhandara CrimeSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला. तर त्याच्या आईसह अन्य चौघांवर नागपूर आणि भंडारा येथे उपचार सुरू आहे. ही घटना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील पहेला गावात शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून या सर्वाना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील जयश मैंद यांच्या ट्रॅक्टर दुरुस्तीच्या दुकानाच्या मागील भागातून लोखंडी सळाखीचे तुकडे चोरी करून एका चुंगळमध्ये भरत असतांना जयश मैंद यांनी चंद्रशेखर कायते (वय २०) याला पहिले. यानंतर काय करताय असे म्हणून ओरडला. यावेळी चंद्रशेखर कायते व त्याच्या साथीदारांनी तेथुन पळ काढत गावाबाहेरील बाजाराच्या ठिकाणी गेले. काही वेळेनंतर जयश मैंद याने विजय मैंद, जितू बांते, प्रज्वल कांबळे, घनश्याम चौधरी, व इतर दहा- बारा लोकांना सोबत घेऊन बाजाराकडे गेले. 

Bhandara Crime
Nagpur : चिमुकली घरबाहेर खेळत होती, भरधाव कारने चिरडलं; रस्ता रक्ताने माखला

बेदम मारहाणीत गंभीर जखमी 

यावेळी चंद्रशेखर कायते व त्याच्या साथीदारांना पकडून चांगलाच चोप दिला. तर संशयित आरोपी जयश मैंद याने चंद्रशेखर याचा साथीदार पृथ्वीराज खंगार (रा. उसरीपार) याला देखील त्या ठिकाणी आणण्यात आले. गावाबाहेर चोरीच्या संशयावरून तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले होते. या दरम्यान मेहबूब मुबारक सय्यद (वय २२, रा. पहेला) याचा १५ एप्रिलला नागपूर येथे मृत्यू झाला. तर अन्य जणांवर उपचार सुरु आहेत. 

Bhandara Crime
Cyber Crime : शेअर्समध्ये अधिकचा नफ्याचे आमिष पडले महागात; ७७ लाख रुपयांची फसवणूक

१४ जणांना पोलीस कस्टडी 

या प्रकरणी पोलिसांनी १६ लोकांना ताब्यात घेतले. तर त्यातील दोघांना सोडण्यात आले. दरम्यान यातील १४ जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. यात आणखी काही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. याकरीता या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करुन इतरांना सोडण्याची मागणी पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com