Bhandara News : बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर फडशा; मानेगाव बाजार, झबाडाचे शेतकरी चिंतेत

मनुष्यांवर बिबट्याने हल्ला केला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे बिबट्याला लवकर जेरबंद करणे गरजेचे बनले आहे.
Leopard, bhandara
Leopard, bhandaraSaam Tv

- शुभम देशमुख

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या मानेगाव बाजार, झबाडा येथे बिबट्याची माेठी दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने तीन गाईचे वासरू, कोंबडी, कुत्र्याची शिकार केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनविभागाने (bhandara forest department) बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

Leopard, bhandara
Wardha News : वर्धेतील बॅंकेच्या १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांवर सायबर चाेरट्यांचा डल्ला

भंडारा जिल्हा ठरणार वाघ व बिबटचा दहशतग्रस्त जिल्हा !! होय, हे ऐकुन आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही. भंडारा जिल्ह्यात वाढती वन्य प्राण्याचे हल्ला व पाळीव पशुंवरील हल्लाचे प्रमाण लक्षात घेता अशी नागरिकांवर ओरड करण्याची वेळ आली आहे.

Leopard, bhandara
Asha Sevika Kaam Bandh Andolan News : शिंदे-फडणवीस सरकारला आशासेविकांचा काम बंदचा इशारा; जाणून घ्या कारण

भंडारा जिल्ह्याच्या विविध ठिकाणी वाघ, बिबटची दहशत पसरली असतांना आता मानेगाव बाजार परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याने तीन गाईचे वासरू,कुत्रा, कोंबडी यांची शिकार केली आहे. आता वनविभागाने गावात ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावत त्या बिबटवर नजर ठेवत आहे.

सद्या शेतीचा हंगाम सुरु असून शेतकरी उन्हाळी धान कापनीला आले असतांना बिबटच्या वावराने शेतात जाताना शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे समूहाने हातात लाठी काठी घेऊन शेतकरी शेतावर जात आहेत असे रोहित चांदेवार यांनी नमूद केले.

दरम्यान रात्रीच्या सुमारास नागरीकांना बिबटचे दर्शन घड़त असल्याने सायंकाळी रस्ता निर्मनुष्य होत आहे. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी अतुल कानतोडे यांच्या नागरिकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com