Bhandara Accident News: वाळूने भरलेल्या ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक; १ ठार तर २ जण गंभीर जखमी

जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Nandurbar Bus Accident
Nandurbar Bus AccidentSaam tv
Published On: 

Accident News: राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यात एका ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १ जण जागीच ठार झाला असून २ जण गंभीर जखामी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Latest Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर सिंदपुरी जवळ वाळूने भरलेल्या ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार बसली वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जन गंभिर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Nandurbar Bus Accident
Nandurbar Bus Accident: खड्डा चुकविताना बसची ट्रकला जोरदार धडक; बसचा पत्राच कापला गेला, प्रवाशी सुखरूप

मच्छेरा गावातील रहिवासी कन्हैया रहांगडाले हे आपल्या ट्रॅक्टरने जनावरांसाठी चारा आणायला गेले होते. ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. सिंदपुरी गावाजवळ बपेराकडून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली त्यात ट्रॅक्टरच्या समोरिल भागाचा चेंदामेंदा झालाय. अपघातात ट्रॅक्टर चालक कन्हैया रहांगडाले यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय तुमसर येथे हलविण्यात आले आहे.

दुचाकी चालकाच्या एका चुकीमुळे विचित्र अपघात

पुणे-सोलापूर (Pune -Solapur) रस्त्यावर रामटेकडी जवळ मॉलच्या समोर दुचाकी चालकाच्या एका चूकीमुळे विचित्र अपघात घडला आहे. एका मागून एक अशा चार वाहनांची धडक या वाहनांना बसली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

Nandurbar Bus Accident
How To Reduce Uric Acid : युरिक ऍसिडने त्रस्त आहात ? दररोज खा 'हे' फळ, मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.