Accident News: ह्रदयद्रावक! भरधाव टिप्परने आजोबा- नातीला चिरडले, दोघांचाही दुर्देवी मृत्यू; शाळेतून घरी आणताना काळाचा घाला

Bhandara News Update: भीषण अपघातात आजोबा आणि नातीला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
Bhandara Accident News
Bhandara Accident NewsSaam tv

Bhandara Accident News: वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत आजोबा आणि नातीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा (Bhandara) शहरात घडली आहे. ट्रकने एक्टिव्हाला पाठीमागून धडक दिल्याने दोघेही ट्रकच्या चाकाखाली आले. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेत असतानाच दोघांचाही अंत झाला. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Bhandara Accident News
Rahul Gandhi Video : माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत - राहुल गांधी

याबाबत अधिक माहिती अशी की, कवडू बडवाईक (वय 73) हे आपल्या नातीला शाळेतून घरी आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. नातीला घेवून घरी परतत असताना भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरानजीक त्यांच्या एक्टिव्हाला भरघाव टिप्परने पाठीमागून धडक दिली. या जोरदार धडकेत ट्रकखाली आल्याने कवडू बडवाईक यांचा जागीच मृत्यू झाला.

तर नात वाणी बडवाईक (वय,६) ही गंभीर जखमी झाली असता उपचारासाठी तिला रुग्णालयात नेत असतानाच तिचाही दुर्देवी मृत्यू झाला.

Bhandara Accident News
Bor Dam : लग्नपत्रिका देऊन चाैघे निघाले हाेते घरी, गाईला वाचवताना झाला अपघात; नागपूरातील युवक ठार, तिघे जखमी

या घटनेची माहिती मिळताच नागपूर नाका परिसरात मोठी गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. भीषण अपघातात आजोबा आणि नातीला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर बेदरकारपणे वाहन चालवत दोघांचा जीव घेणाऱ्या टीप्पर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. (Accident News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com