Bhandara : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर अश्लिल व्हिडिओ काढून केले व्हायरल; अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर

Bhandara Crime News : भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Bhandara : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर अश्लिल व्हिडिओ काढून केले व्हायरल;  अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर
Bhandara Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवरील गंभीर गुन्हा

  • आरोपीकडून अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल

  • पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत आरोपीला अटक

  • मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara Crime News भंडाऱ्यात एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही १७ वर्षाची असून तिला वडील नाही. मोलमजुरी करून आई तिचं पालनपोषण करीत असून भंडारा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात ११ वी चं शिक्षण घेतं आहे. आरोपी तरुण हा २० वर्षांचा आहे. सदर मुलीला तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्याशी मैत्री करत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Bhandara : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर अश्लिल व्हिडिओ काढून केले व्हायरल;  अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर
Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीच्या आईनं भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत, यापूर्वी या तरुणाच्या कुटुंबीयांना समज देण्याबाबत सांगितलं असता त्यानं फिर्यादी आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचा या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती भंडाऱ्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. भंडारा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणा विरोधात पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com