Beed: अभ्यासाला अन् दिसायलाही सेम टू सेम, बीडच्या जुळ्या बहि‍णींना दहावीत मिळाले जुळे गुण

Twin Sisters from Beed Score Identical 96% in Class 10 Exams: बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहे.
Beed
BeedSaam
Published On

दहावीचा निकाल लागला. यंदा राज्याचा निकाल ९४ टक्के लागला. अनेक मुलांना घवघवीत यश मिळाले. पण या सगळ्यात बीडच्या जुळ्या बहिणींची सर्वाधिक चर्चा होत आहे. बीडच्या आष्टी शहरातील जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत अगदी 'जुळवून घेतल्यासारखे' यश मिळवले आहे. दोघींनीही समान गुण, म्हणजेच ९६ टक्के गुण मिळवले असून, त्यामुळे त्यांची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.

धीरज देशपांडे यांच्या या जुळ्या मुली दत्त मंदिर परिसरात राहतात. अनुष्का आणि तनुष्का असे जुळ्या बहिणींचे नाव. यंदा त्यांचं दहावीचं वर्ष होतं. दहावीत दोघांनाही ९६ टक्के मिळाले. अभ्यासाव्यतिरिक्त जुळ्या बहिणींना नृत्याची आवड आहे. अभ्यासात सातत्य आणि शाळेच्या उपक्रमांत सहभाग असल्याने त्या शाळेतील गुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या.

Beed
'आपकी बात मान लेंगे', तडीपार अमित शहांची बाळासाहेबांना विनंती, मातोश्रीवर एका फोनमुळे नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे, त्या दोघी सतत एकत्र अभ्यास करायच्या, एकमेकींच्या शंकांचे निरसन करायच्या आणि शाळेच्याही सर्व प्रवासात सोबत असायच्या. निकाल जाहीर झाल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेना. 'एकसारखे गुण मिळतील असं वाटलं नव्हतं, पण खूप आनंद झालाय,' असं अनुष्काने सांगितलं.

Beed
Pune Crime: ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडनं शरीरसंबंधाचे व्हिडिओ केले व्हायरल, थेट पॉर्न साईटवर टाकले, मैत्रिणीने पाहताच...

त्यांच्या या यशानंतर देशपांडे कुटुंबीयांनी दोघींनाही औक्षण करून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला. या 'जुळ्या यशाची' बातमी सध्या गावात कौतुकाचा आणि प्रेरणादायी विषय बनली आहे.

Beed
Crime: बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासमोर नग्न होऊन व्हिडिओ करणारी तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर, धक्कादायक माहिती उघड, सगळेच हैराण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com